स्वातंत्र्यवीर सावरकरांना
बांदा वाचनालयात वंदन

स्वातंत्र्यवीर सावरकरांना बांदा वाचनालयात वंदन

87238

स्वातंत्र्यवीर सावरकरांना
बांदा वाचनालयात वंदन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील नट वाचनालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून अनंत भाटे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रमुख पाहुणे अनंत भाटे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग व त्यांच्या महान कार्याची आठवण करून दिली. यावेळी वाचनालयाचे सदस्य प्रकाश पाणदरे, सुधीर साटेलकर, बालवाचक व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यवाह राकेश केसरकर यांनी आभार मानले. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने सावरकरांच्या समग्र साहित्याचे ग्रंथप्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com