रत्नागिरी- परिचालन प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू

रत्नागिरी- परिचालन प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू

सागरी नौकानयन परिचालन
प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू
रत्नागिरी, ता. २ : सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणाचे आयोजन वर्सोवा, मुंबई उपनगर येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात आयोजित केले आहे. १ जुलै ते ३१ डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीसाठी हे प्रशिक्षण होईल.
मत्स्य व्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण वर्सोवा येथे देण्यात येते. या केंद्रातून मत्स्य व्यवसाय नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डिझेल इंजिनच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.
या प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थींकडून प्रतिमहिना ४५० रुपये व दारिद्रयरेषेखालील प्रशिक्षणार्थींकडून १०० रुपये शुल्क आकारले जात असून, या प्रशिक्षणासाठी, पात्र प्रशिक्षणार्थीसाठी निकष आहेत. प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छीमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक / आधारकार्डधारक असावा. प्रशिक्षणार्थींचा अर्ज विहित नमुन्यात परिपूर्ण असावा व त्या अर्जावर संबंधित मच्छीमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गटविकास अधिकारी यांच्या दाखल्याची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छीमारांनी विहित नमुन्यातील अर्ज आपल्या मच्छीमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरेगल्ली, वर्सोवा, मुंबई-६१ येथे २० जूनपर्यंत सादर करावेत. अधिक माहितीकरिता सचिन भालेराव, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com