रक्तदान चळवळ वृद्धिंगत करा

रक्तदान चळवळ वृद्धिंगत करा

87341

रक्तदान चळवळ वृद्धिंगत करा

रणजित देसाई ः पिंगुळीतील शिबिरात ४२ जणांचे रक्तदान

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदानासारखी चळवळ ग्रामीण भागात रुजत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. रक्तदान केल्याने कोणाचा तरी जीव वाचतो. रक्तदान हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई यांनी पिंगुळी येथे रक्तदान शिबिरात केले. या शिबिरात ४२ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथील श्री देव रवळनाथ सभागृहामध्ये शिबिराचे आयोजन केले होते. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन झाले. यावेळी रणजित देसाई, विकास कुडाळकर, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, राजन पांचाळ, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे प्रकाश तेंडोलकर, तेंडोली माजी सरपंच भाऊ पोतकर, मंगेश चव्हाण, दशरथ राऊळ साधना माड्ये, भूषण तेजम, अमित तेंडुलकर, सतीश माडये, बाबल गावडे, गणेश गाड, नितीन कदम, सुधीर चव्हाण, मोहन पिंगुळकर, अमित चव्हाण, आबा चव्हाण, सचिन चव्हाण, उमेश चव्हाण, सूरज चव्हाण, आकाश माड्ये, दयानंद पालकर, सुशांत बांदवलकर, सिध्देश दाभोलकर, प्रवीण माड्ये, संतोष तुळसकर, बंटी परब, मामा पालव, अविराज धुरी, जयदीप मकानी, परेश गेवरिया, ओरोस रक्तपेढीचे डॉ. मोहन बिडगर, प्रांजली परब, कांचन परब, ऋतुजा हरमलकर, प्रथमेश घाडी, सुरेश डोंगरे, नितीन गावकर आदी उपस्थित होते. प्रत्येकाने वर्षातून किमान दोनदा तरी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात हातभार लावावा, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर यांनी सांगितले. मंगेश चव्हाण यांनी रक्तदानासारखी चळवळ राबवल्याबद्दल कौतुक केले. गावागावांत आज रक्तदानसारखे उपक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत, हे निश्चितच प्रेरणादायी आहे, असे माजी सभापती वेंगुर्लेकर यांनी सांगितले.
---
सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद
देसाई पुढे म्हणाले, ‘‘सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण यांनी रक्तदानासारखा स्तुत्य उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आज मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अनेकांना रक्ताची गरज भासते. गरजू रुग्णाला त्या त्या गटानुसार रक्त दिले जाते, असे सांगितले. यानिमित्ताने स्वतःचे रक्त देऊन दुसऱ्याचा प्राण वाचविणे हा स्वभाव आपल्या त्या रक्तदान चळवळीतून निर्माण झालेला आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com