गुहागर-महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा

गुहागर-महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा

87326

महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा
गुहागर नगरपंचायत : विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण
गुहागर, ता. २ : गुहागर नगरपंचायत, प्रकृती फाउंडेशन आणि मर्म फाउंडेशन यांच्यावतीने गुहागर शहरातील बचतगटातील महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा झाली. कार्यशाळेत बचतगटातील महिलांसाठी पर्स तयार करणे आणि बाटिक कापड तयार करणे याची प्रात्यक्षिके महिलांकडून करून घेण्यात आली.
गुहागर नगरपंचायतीमधील बचतगटातील महिलांसाठी उद्यमशीलता विकसित करून त्यांना मार्केटिंगसाठी उत्तम दर्जाच्या पर्स आणि खूप मागणी असलेले बाटिक कापड तयार करून घेण्याची कला शिकवण्यात आली. त्याचबरोबर या महिलांसाठी अगदी मोफत वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मर्म संस्थेकडून व मार्केटिंग स्किल प्रकृती फाउंडेशनकडून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण आणि महिला सबलीकरण हे दोन्ही उद्देश साध्य होत आहेत, असे संथेच्या मिलन गुरव-जंगम यांनी सांगितले. टाकाऊ जीन्समधून महिलांसाठी एक ओळख निर्माण करणारा उद्योग उभा करता येऊ शकतो, असे मर्म संस्थेच्या मेधा शहा आणि मुग्धा देसाई यांनी सांगितले. विविध प्रकारच्या पर्स आणि ज्वेलरी आपण घरबसल्या कसे तयार करू शकतो तसेच टाकाऊतून टिकाऊ काय काय तयार करू शकतो याची माहिती आणि प्रत्यक्ष काही वस्तू बनवून दाखवल्या.
ज्या व्यक्ती किंवा संस्था या पर्यावरणीय कार्य आणि महिला सबलीकरण यामध्ये काम करायचे आहे त्यांनी या कार्यात सहभागी होण्याचे आवाहनही या संस्थांनी केले आहे. या उपक्रमासाठी गुहागर नगरपंचायतीच्या समूह संघटिका सुचेता आंबोकर, अवंती गमरे, साठले यांनी विशेष साहाय्य केले. प्रकृती फाउंडेशनच्यावतीने येणाऱ्या महिलांपैकी अनिता राऊत या भाग्यवान विजेतीला एक सुंदर साडी भेट देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com