रत्नागिरी- भाट्ये किनारा अस्वच्छ

रत्नागिरी- भाट्ये किनारा अस्वच्छ

87322
87323
87324
87325
------------
भाट्ये समुद्रकिनाराही अस्वच्छच
पर्यटकांमध्ये नाराजी ; प्लास्टिक बाटल्यांचा खच, स्वच्छतेची गरज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : मांडवी समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेनंतर आता भाट्ये समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेची गरज आहे. भाट्ये झरीविनायक मंदिर व मुख्य किनाऱ्याजवळ प्लास्टिक कचरा, बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळत आहे. येथे पर्यटकांची गर्दीही असते, परंतु अस्वच्छतेमुळे येथे पर्यटक नाराजी दर्शवत आहेत. कोकणातील समुद्रकिनारे स्वच्छ कुठे आहेत असा सवाल पर्यटक उपस्थित करत आहेत.
रत्नागिरी शहराला लागून असलेल्या भाट्ये गावाला सुमारे दीड किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. येथे आगळी वेगळी जैवविविधतासुद्धा पाहायला मिळते. तसेच श्री झरीविनायक मंदिर असल्यामुळे दर्शनासाठी नेहमीच भाविकांची रिघ लागलेली असते. पावस मार्गावरील पहिला भाट्ये किनारा अतिशय सुरेख व प्रशस्त किनारा, सुरूबन पर्यटकांना साद घालते. परंतु अलीकडे या किनाऱ्यावर कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे.
भाट्ये किनाऱ्यावर पाणी पुरी, भेळ व स्नॅक्सच्या गाड्या, लहान मुलांसाठी खेळणीसुद्धा आहेत. साधारण वीस ते तीस स्टॉल असतात.
अलीकडे मुख्य रस्त्यावरून किनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणही करण्यात आले आहे. यामुळे पर्यटक येथे थांबतात. परंतु अस्वच्छता पाहून मात्र ते नाराजी व्यक्त करतात. समुद्रावर येणारे लोक प्लास्टिक कागद, बाटल्या, पिशव्या टाकतात. तसेच समुद्र आपल्या पोटात काही ठेवत नाही. त्यामुळे तो खराब कचरा किनाऱ्यावर आणून सोडतो. लाटांबरोबर हा कचरा किनाऱ्यावर येऊन तसाच राहतो. येथे स्वच्छता करण्याची आवश्यकता आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे रत्नागिरीच्या पर्यटनावर परिणाम होत असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. भाट्ये किनाऱ्याला स्वच्छ व सुंदर किनाऱ्याचे रूप पुन्हा प्राप्त होण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com