देवरूखातील सामाजिक कार्यकर्ता मेळाव्याला प्रतिसाद

देवरूखातील सामाजिक कार्यकर्ता मेळाव्याला प्रतिसाद

सामाजिक कार्यकर्ता
मेळाव्याला प्रतिसाद
साडवली, ता. २ : महाराष्ट्रातील सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींचे स्नेहसंमेलन देवरूख येथे उत्साहात झाले. कार्यक्रमाचे संयोजक महादेव रानडे, सदानंद भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या समुहातर्फे देखणी ती पावले या सदराखाली आत्तापर्यंत ८ भागाची लेख मालिका (७२ लेख) पुस्तिका महादेव रानडे यांनी प्रसिद्घी केली आहे. या कार्यक्रमात पुढील कामाची दिशा व पुढील संमेलनाचे नियोजन या विषयी चर्चा झाली. महाराष्ट्रातील अशा अनेक मंडळींना एकत्र आणून त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासित करण्यात आले. सदानंद भागवत यांनी देवरूख येथील नवीन सृजन सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर व इतर सर्व शिक्षणसंस्थांची भेट आयोजित करून माहिती दिली.
स्नेहसंमेलनामधून आम्ही सर्वजण एकमेकांच्या अधिक जवळ आलो आहोत आणि एकमेकांना ऊर्जा देण्याचे काम केले आहे. प्रत्येकाचे उद्दिष्ट समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचे आहे. या भावनेतून प्रत्येकजण आपल्यापरीने हे व्रत म्हणून करतच आहे. एकमेकांचा हात हातात घेऊन आपण ते काम केले तर आपापले काम आणखी ताकदीने करू शकू, असा विश्वास निर्माण झाला. एकसंघपणाची भावना रूजवण्यामध्ये या संमेलनात नक्कीच यशस्वी झालो आहोत, असे सर्वांनी नमूद केले.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com