सौजन्या घाटकरचा
ठाकरे गटातर्फे सत्कार

सौजन्या घाटकरचा ठाकरे गटातर्फे सत्कार

सौजन्या घाटकरचा
ठाकरे गटातर्फे सत्कार
कुडाळ, ता. २ ः साळगाव (ता.कुडाळ) येथील सौजन्या घाटकर हिने १० वी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर जांभवडे येथील परेश मडव याने बारावी परीक्षेत ९४.८३ टक्के गुण मिळवत विज्ञान शाखेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल गुरुवारी (ता ३०) आमदार वैभव नाईक व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिक्षकांचे देखील अभिनंदन केले. सौजन्या घाटकर ही कुडाळ येथील बॅ. नाथ पै विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, शहरप्रमुख संतोष शिरसाट, सचिन काळप, दीपक आंगणे, गंगाराम सडवेलकर, राजू गवंडे, प्रेमदास राठोड, धोंडी गावडे, आशिष राठोड, हनुमंत गोसावी, सहदेव चव्हाण, महेश सावंत, गुरू मेस्त्री, भास्कर मडव, रघुनाथ मडव, प्रथमेश मडव आदी उपस्थित होते.
................
प्रा. कुनूर यांना
पुरस्कार प्रदान
देवगड, ता. २ ः येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालया प्र. प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनूरे यांना २०२३-२४ चा राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन आणि आरोग्य व निसर्ग विकास संघटना बेळगाव ही संघटना दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, राज्यात कार्यरत असून, या संघटनेमार्फत दरवर्षी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, राज्यातून निवडक व्यक्तींमध्ये डॉ. विजयकुमार कुनूरे यांचे शैक्षणिक आणि संशोधनातील उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांची निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचा वितरण समारंभ नुकताच हरमल-गोवा येथे झाला. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. विजयकुमार कुनूरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
---
कणकवलीत शिबिरात
३५ जणांची चिकित्सा
कणकवली, ता. २ ः येथील गुरुकृपा हॉस्पिटलच्या सभागृहात ग्लेन मार्क फार्मास्युटिकल कंपनी आणि लायन्स क्लब ऑफ कणकवली यांच्या विद्यमाने छोटेखानी ब्लडप्रेशर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे ३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. फार्मा कंपनीचे डिस्ट्रिक्ट सेल्स मॅनेजर विनायक भोकरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. या शिबीरामध्ये डॉ. बी. एस. महाडेश्वर यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सौ. शमिता विम्पोळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. लायन्स क्लब ऑफ कणकवलीचे यक्ष डॉ. प्रवीण बिरमोळे, सचिव दादा कोरडे, प्रा. दिवाकर मुरकर, महेश काणेकर, सौ. कोरडे, सिद्धार्थ तांबे, फार्मासी कंपनीचे कर्मचारी तसेच रुग्ण उपस्थित होते. यावेळी दहावी, बारावी परीक्षेत ''नंबर वन'' गुणवंतांचा आमदार नाईक यांनी गुणगौरव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com