रत्नागिरी-वाहतूक पोलिसांची रात्री उशिरा कारवाई

रत्नागिरी-वाहतूक पोलिसांची रात्री उशिरा कारवाई

87375

वाहतूक पोलिसांची रात्री उशिरा कारवाई
दुचाकीधारकांची ताराबळ : अल्पवयीन मुलांच्या पालकांना मोठा दंड
रत्नागिरी, ता. २ : पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणानंतर जिल्हा पोलिसदल अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. अल्पवयीन, विनापरवाना दुचाकी चालवणे, धुमस्टाईल दुचाकी पळवणे या प्रकारावर बारीक लक्ष ठेवून आहेत. वाहतूक पोलिसांनी रात्री अकरा वाजेपर्यंत शहरातील मांडवी जंक्शनवर थांबून सुमारे ५० जणांवर कारवाई केली. यामध्ये अल्पवयीन मुलाच्या वडिलांना २५ हजाराचा दंडही केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या संदर्भातील आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. पुढील ९ तारखेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. अनेक भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत अल्पवयीन मुले, तरुण शहरात दुचाकीवरून विनाकारण फिरतात. काही तरुणांकडे तर दोन ते चार लाखापर्यंतच्या दुचाकी आहेत. त्यात काहीजण दुचाकी धुमस्टाईलने सुसाट पळवतात. यामुळे अनेक अपघात झाले आहेत आणि होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत काहींना त्यामुळे जीव गमवावा लागला आहे.
पुण्यात नुकतेच हिट अॅण्ड रन प्रकरण झाले. राज्यात हा विषय गाजत असल्याने पोलिसदल याबाबत सतर्क झाले आहे. या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी वाहतूक पोलिस आता अॅक्टिव्ह मोडमध्ये आहे. काल रात्री शहरातील मांडवी नाक्यावर चार ते पाच वाहतूक पोलिस वाहनांची तपासणी करत होते. उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांना पाहून अनेकजण दचकलेच. त्यांनी दुचाकी थांबविल्यानंतर अनेकांची तंतरली. कोणाकडे वाहन परवाना नाही, काहीजण तर ट्रीपल सीट, काही अल्पवयीन, काही दारूच्या नशेत होते, काही विनाकारण फिरत होते, अनेकांनी पोलिसांना पाहून गाडी वळवून मागे पळून गेले. वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत ५० दुचाकीस्वारांवर कारवाई केली. अल्पवयीन मुलाच्या वडिलांना नवीन वाहतूक नियमांप्रमाणे २५ हजाराचा दंड केला. यापुढे देखील बेशिस्तपणे दुचाकी चालविणाऱ्यांवर असाच कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com