सवंगडी जमताच आठवणींना उजाळा

सवंगडी जमताच आठवणींना उजाळा

87378

सवंगडी जमताच आठवणींना उजाळा

वेंगुर्ले हायस्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेहमळावा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ : वेंगुर्ले हायस्कूल, वेंगुर्ले एस. एस. सी. ग्रुप १९९२-९३ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा तिसरा स्नेहमेळावा नुकताच आदर्श पर्यटन केंद्र, वेंगुर्ले कॅम्प येथे उत्साहात झाला. या मेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, मनोगत सादर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक एस. एस. काळे यांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शविली. माजी विद्यार्थी बाळा आरांवदेकर यांच्या हस्ते काळे यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. मजेशीर खेळ व गाणी तसेच इतर कार्यक्रमांनी हा स्नेहमेळावा यादगार ठरला. आदर्श पर्यटन केंद्र वेंगुर्ले कॅम्प या रमणीय व निसर्गरम्य पर्यटनस्थळी या मेळाव्याचे आयोजन केले होते. स्नेहमेळाव्यानिमित्त पुन्हा एकदा एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या संवादाने संबंध अधिकच दृढ झाले. आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढ-उतारांचे अनुभव कथन करीत सर्वांनी मने मोकळी केली.
दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी-व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दुरावलेले हे विद्यार्थी-विद्यार्थिनी पुन्हा एकदा तब्बल ३१ वर्षांनंतर स्नेहमेळाव्यात एकत्र आले. वेंगुर्ल्यातील स्थायिक व आता नोकरी निमित्ताने पुणे, मुंबई, गोवा, कतार, मध्यप्रदेश, अमेरिका अशा देशविदेशांत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा स्नेहमेळावा पुन्हा एकदा तिसऱ्या वर्षी यादगार ठरला. नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बाळा आरांवदेकर, राकेश परब, सुधीर गावडे, विनोद परब, आनंद परब, अनंत परब, हेमंत चव्हाण, यशवंत ऊर्फ बली नाईक, केदार आंगचेकर, प्रसाद मराठे, नामदेव सरमळकर, सुमन परब, मनीषा पालव, शोभना जोशी, प्रतिभा परब, दीपक परब, मनीषा रेडकर, प्रभाकर देऊलकर, ललिता फाटक, साधना फाटक, जॉयसी कार्डोज, संजू फर्नांडिस, राजन कांबळी, महेंद्र जाधव, जयेंद्र गावडे, दिंगबर आरोलकर, उल्हास मुळीक, सुनील मुळीक, सारिका पाटील, सुहासिनी सावंत, नीलेश बांदेकर, नरेंद्र नाईक, हेमंत चव्हाण, घन:शाम केरकर, रोहन रणभिसे, हरिश्चंद्र कोचरेकर, प्रशांत दीपनाईक, गुरुनाथ तांडेल, गंगाराम परब, अर्जुन कासवकर, प्रसाद मराठे, संतोष परब, संतोष गोरे, नीलेश गंगावणे, अशोक आरोलकर, आदी उपस्थित होते. सुमन परब यांनी सूत्रसंचालन केले. तर राकेश परब यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com