समर युथ समिटची उत्सुकता

समर युथ समिटची उत्सुकता

८७३९२/ ८७३९४
(वरील दिलेल्या क्यूआर कोडचा आणि लोगोचा वापर करावा.)

‘समर यूथ समिट २०२४’ची उत्सुकता शिगेला

महाराष्ट्रातील ‘यिन’ची तरुणाई ११ जूनला पुण्यात होणार दाखल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : आर्थिक उन्नतीचे ज्ञान, सामाजिक जाण आणि देशभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी तरुणाईच्या उत्सवाचे आयोजन ‘यिन’च्या वतीने ‘समर यूथ समिट २०२४’ या निवासी शिबिरातून केले आहे. राज्यातील हजारोंच्या संख्येने तरुणाई या समिटसाठी ११ जून रोजी पुण्यात दाखल होणार आहे. हे विद्यार्थी एकत्र येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत विचारमंथन करणार आहेत. ‘यिन’ने राज्यात लाखोंचे संघटन उभे केले आहे. यामध्ये काम करणारी तरुणाई दरवर्षी अनेक उपक्रमांत सहभागी होत असते. या उपक्रमांमधील ‘समर यूथ समिट’ हा महत्त्वाचा उपक्रम आहे.
आजपर्यंत विविध क्षेत्रांत अनेक मान्यवरांना मिळवलेल्या यशाचे गमक ते सहभागी तरुणाईसमोर ठेवणार आहेत. स्वतःमधील कला ओळखून त्यात कसे काम करावे, आता मी कुठे आहे, मला काय करायला हवे, समोर आलेल्या समस्येला तोंड कसे द्यावे, सकारात्मकता कशी वाढवावी, सध्या आणि नंतर बाजारपेठेत कशाला मागणी असेल, संधीची वाट पाहण्यापेक्षा-संधी निर्माण कशी करावी, मुलाखतीला कसे सामोरे जावे, अशा मनातील अनेक प्रश्नांवर तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.
समर यूथ समिट २०२४ पॉवर्ड बाय पिंपरी-चिंचवड विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, असोसिएट स्पॉन्सर ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल आणि महाएनजीओ फेडरेशन या कार्यक्रमाच्या काहीच जागा शिल्लक असल्याने ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदवायचा आहे. त्यांना बरोबर दिलेल्या क्यूआर कोडचा वापर करून ऑनलाईन अॅपवरून नावनोंदणी करीत येईल. अधिक माहितीसाठी : अवधूत गायकवाड, यिन सहायक व्यवस्थापक (९९७५१३१२७०), मोहन मोरे, यिन प्रतिनिधी (९९७५५५१७१९) यांच्याशी संपर्क साधावा.
...

कोटस्‌
बदलत्या काळानुसार तरुणांनी स्वतःला बदलणे अपेक्षित आहे. पदवी आणि चांगल्या मार्कांबरोबर सर्वांगाने परिपूर्ण व्यक्तिमत्त्व असणे आवश्यक आहे. सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाच्यादृष्टीने या समिटमधील विविध मान्यवरांचे मार्गदर्शन तरुणांना लाभदायी ठरेल.
- प्रा. डॉ. जयेंद्र खोत, कुलसचिव, डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे

आगामी काळ आव्हानांचा असणार असून, तरुणांनी ही आव्हाने पेलण्यास सज्ज राहावे आणि त्यादृष्टीने स्वतः सक्षम बनावे. सक्षम होण्यासाठी आत्मविश्वास ज्ञान, माहिती, कौशल्य, आत्मविश्वास अशा गुणांच्या बळावरच आव्हाने पार करता येतील. निश्चितच या समिटच्या माध्यमातून सहभागी तरुणांना सर्व काही मिळेल.
- डॉ. सतीश पावसकर, संचालक, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपला दृष्टिकोन महत्त्वाची भूमिका बजावतो. यशापयश पचवण्याची तयारी, सातत्याने प्रयत्न करण्याची जिद्द असेल, तर सर्व काही प्राप्त करू शकतो. हा दृष्टिकोनच तरुणांना जीवनात यशस्वी बनवेल आणि समिटच्या माध्यमातून कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या मार्गदर्शनाने हा दृष्टिकोन महाराष्ट्रातील तरुणाई अंगीकारेल हा विश्वास आहे.
- प्राचार्य डॉ. पूजा नरवाडकर, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगली

‘यिन समिट’च्या माध्यमातून केवळ शैक्षणिक नव्हे; तर सांस्कृतिक कार्यदेखील होत आहे. महाराष्ट्राच्या गाव खेड्यातील ग्रामीण भागातील तरुणांपासून मेट्रो सिटीतल्या तरुणांचा यामध्ये सहभाग आहे. याद्वारे विचारांचे आदान-प्रदान होईल. एक सुसंस्कृत युवा पिढी घडवण्याचे अमूल्य कार्य ‘यिन’द्वारे होत आहे. ‘यिन समर यूथ समिट’ला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
- प्रा. प्रवीण बी. घेवारी, उपप्राचार्य, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वाठार तर्फ वडगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com