अनिल सरमळकर यांचा 
आम आदमी पक्षात प्रवेश

अनिल सरमळकर यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

87408

अनिल सरमळकर यांचा
आम आदमी पक्षात प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता.३ : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक, नाटककार, परिवर्तन चळवळीतील तरूण विचारक अनिल सरमळकर यांनी काल आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला. आपच्या राज्यस्तरीय, कोकण प्रांत व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कणकवली येथे आपमध्ये त्यांचा प्रवेश झाला.
कणकवली झालेल्या एका कार्यक्रमात आपचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. अभिजीत मोरे, महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटन सचिव डॉ. रियाज पठाण, महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटन सचिव संग्राम पाटील, महाराष्ट्र राज्य सहसचिव अविनाश देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, मिली मिश्रा, आदित्य बटावले, मेहबूब मुल्ला, स्वप्नील मीठकर, राजेश माने, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते. आपल्या मराठी, इंग्रजी लेखनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले कोकणचे सुपुत्र अनिल सरमळकर हे गेली दोन दशके मराठी व इंग्रजीमधून सातत्याने दिर्घ कविता, कादंबरी, नाटक समीक्षा, पटकथा आदी क्षेत्रात लेखन करीत असुन ते रंगभूमी व चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. आपल्या इंग्रजी नाट्य व समीक्षा व वैचारीक लेखनामुळे त्यांना जागतिक पातळीवर ओळख मिळाली आहे. गेली दोन वर्षे सांगोपांग विचार केल्यानंतर त्यांनी आपचे कार्य, त्यांचे ध्येय धोरण पटल्याने तसेच आपचे सर्वेसर्वा संस्थापक व आदर्श नेते अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव मान्य करुन अनिल सरमळकर यांनी अखेर आपमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com