तंबाखूविरोधी दिन
कणकवलीत साजरा

तंबाखूविरोधी दिन कणकवलीत साजरा

तंबाखूविरोधी दिन
कणकवलीत साजरा
कणकवली ः जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नशाबंदी मंडळ व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. श्याम पाटील, डॉ. चिपळूणकर, डॉ. चुबे, डॉ. समीर धाकरकर, डॉ. सुबोध इंगळे, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर आदी उपस्थित होते. यावेळी तंबाखू नियंत्रण कक्षातर्फे रांगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नशाबंदी मंडळातर्फे तंबाखू नियंत्रण विभागाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘भारतीय संविधान कलम ४७’ ची प्रत देऊन विभागाचा सन्मान करण्यात आला. अर्पिता मुंबरकर यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत व तंबाखूपासून दूर राहण्यासाठीच्या उपाययोजना सांगितल्या. सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. अल्मेडा यांनीही तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली. संदीप मोहोड यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती जाधव यांनी आभार मानले.
---
मोरजकर ट्रस्टतर्फे
पुरस्कारासाठी आवाहन
कणकवली ः नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कविवर्य नारायण सुर्वे आणि कविवर्य वसंत सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या नावाने काव्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कार योजनेत कोणत्याही वयातील कोणत्याही कवी-कवयित्रीला सहभागी होता येईल. कवींनी आपल्या सर्वोत्कृष्ट पाच कविता पाठविणे गरजेचे आहे. गुणवत्ता असणाऱ्या कवींना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने गुणवंत कवींचा कविवर्य सुर्वे आणि कविवर्य सावंत यांच्या नावाचे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. दोन्ही पुरस्कार विजेत्या कवींना प्रत्येकी १५०० रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी अंतिम निवड मान्यवर कवींच्या परीक्षणातून केली जाणार आहे. पुरस्कारासाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख ३० जून आहे. कविता भ्रमणध्वनीवर पाठवावी व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
--
‘गौड सारस्वत’तर्फे
गुणगौरव सोहळा
सावंतवाडी ः गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्ग सारस्वत समाजातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये दहावी, बारावी परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात येणार आहे. सारस्वत समाजातील ज्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावी परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थी, पालकांनी गुणपत्रिकेसह अर्ज बुधवारपर्यंत (ता. ५) आपली नावे संस्थेकडे पाठवावीत. सोबत आपला संपर्क मोबाईल नंबर द्यावा. विद्यार्थ्याचे वडील किंवा आई संस्थेचे सभासद असणे आवश्यक आहे. आपली नावे संतोष पई, सबनीसवाडा, सावंतवाडी किंवा प्रसाद महाले, सबनीसवाडा, सावंतवाडी यांच्याकडे प्रत्यक्ष अगर व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवावीत, असे आवाहन संस्थाध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी यांनी केले आहे.
--
दोन गाड्यांना
जादा स्लीपर
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दोन गाड्यांना जादा शयनयान कक्ष वाढविण्यात आला आहे. यात उधना ते मेंगलूरू (०९०५७) आणि मेंगलूरू-उधना (०९०५८) या गाड्यांना तात्पुरती एक जादा स्लीपर वाढविण्यात आली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com