तेरवणमध्ये १३० जणांची चिकित्सा

तेरवणमध्ये १३० जणांची चिकित्सा

87516

तेरवणमध्ये १३० जणांची चिकित्सा
शिबिरास प्रतिसादः ‘सिंधुमित्र’ ग्रामस्थ मंडळाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ः येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि दोडामार्ग तालुक्यातील तेरवण ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने तेरवण गावात रविवारी (ता. २) रोगनिदान व चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या वैद्यकीय सेवाभावामुळे भारावलेल्या तेरवणवासीयांनी आभार व्यक्त केले. चंदगड आणि दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर अतिदुर्गमस्थानी असलेल्या तेरवण गावात हे पहिलेच आरोग्य शिबिर झाले. या शिबिराचा १३० जणांनी लाभ घेतला.
तेरवण गावचे ग्रामदैवत श्री सातेरी भावई मंदिराच्या सभामंडपात घेण्यात हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सावंतवाडीच्या जीवनरक्षा हॉस्पिटलचे डॉ. शंकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, फिजिशियन डॉ. नंददीप चोडणकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वाती पाटील, स्त्रीरोग प्रसुती तज्ज्ञ डॉ. अंकिता मसूरकर, डॉ. मुग्धा ठाकरे, डॉ. राहुल गव्हाणकर, माणगावच्या परब हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. चेतन परब, सामाजिक युवा कार्यकर्ते विजय गवस, मानकरी जयराज गवस, माजी सैनिक सोमा गवस, सदाशिव गवस, तुकाराम गवस, नागेश नाईक, संतोष गवस, दत्ताराम गवस, राजाराम गवस, मिरवेल सरपंच संतोष पवार, माजी सरपंच विद्याधर बाणे, नामदेव गवस, शंकर गवस, रोहन सावंत, ओमकार गवस, अपर्णा गवस, गोपाळ गवस आदी उपस्थित होते.
या शिबिरात उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केली. रुग्णांची ब्लड शुगर तपासणीही करण्यात आली. त्यानंतर मोफत औषधे देण्यात आली. अतिदुर्गम तेरवण गावात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल तेरवण ग्रामस्थांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या आरोग्य सेवेच्या उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अँड्र्यू फर्नांडिस, आनंद साधले, भगवान रेडकर, दीपक गावकर, सिद्धेश मणेरीकर यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com