हर्णै बंदरातील मच्छीमारांची लगबग थांबली

हर्णै बंदरातील मच्छीमारांची लगबग थांबली

87543
87544

हर्णै बंदरातील मच्छीमारांची लगबग थांबली
आंजर्ले खाडीत शाकारणी; दोन महिने मासेमारी थांबली
हर्णै, ता. ३ ः शासनाने १ जूनपासून मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे हर्णै बंदरातील मच्छीमारांनी नौका आंजर्ले-अडखळ खाडीत आणून नौकांच्या शाकारणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे बंदरात शुकशुकाट पसरला असून मच्छीमारांची लगबग आणि विक्रेत्यांची गडबड थांबली.
केवळ जेटी नसल्याने हर्णै बंदरात मासेमारी करणाऱ्या बहुतांश नौकांना आंजर्ले, अडखळ खाडीत आसरा घ्यावा लागतो. आता बंदीचा कालावधी सुरू झाल्याने सुरक्षित जागा मिळेल तिथे मच्छीमार नौका शाकारून ठेवत आहेत. हर्णै बंदरात लहान मोठया साधारणपणे एक हजार नोंदणीकृत मासेमारी नौका आहेत. जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णै बंदर हे दुसऱ्या क्रमांकाचे मासेमारी बंदर असले तरी अजूनही हर्णै बंदरात मासेमारी नौका लावण्यासाठी जेटीची व्यवस्था नाही. त्यामुळे बंदरातील नौकांना बंदरापासूनच दूर आंजर्ले, अडखळ खाडीसह दाभोळ बंदरात बोटी सुरक्षित लावण्यासाठी घेऊन जावे लागते.
१ जून ते ३१ जुलै या दरम्यानच्या कालावधीत मासळीच्या प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवीत व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मत्स्य खात्याने केले आहे.

कोट
पावसाळी हंगामातील हवामान हे समुद्रात जाण्यासाठी धोक्याचे असते. शासनाने धोक्याचा काळ निर्धारित केला असल्याने समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊन कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास शासन नुकसान भरपाई देत नाही. त्यामुळे कुठल्याही यांत्रिक बोटींनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- दीप्ती साळवी, परवाना अधिकारी, दापोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com