देवगडच्या ‘त्या’ संस्थेवर प्रशासक नेमा

देवगडच्या ‘त्या’ संस्थेवर प्रशासक नेमा

87536

देवगडच्या ‘त्या’ संस्थेवर प्रशासक नेमा

पालकांची मागणी ः शैक्षणिक नुकसानीचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः येथील ‘त्या’ शैक्षणिक संस्थेच्या कारभाराबाबत काही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून संबधित संस्थेवर प्रशासक नेमण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत शासनाकडे मागणी केल्याची माहिती ग्रामस्थांनी पत्रकारांना दिली. एका अभ्यासक्रमातून दिशाभूल झाल्याचे सांगत यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असल्याकडेही पालकांनी यावेळी लक्ष वेधले. यावेळी मुख्य तक्रारदार प्रकाश लळीत तसेच निशिकांत साटम, विलास रुमडे, योगेश चांदोस्कर यांच्यासह काही पालकही उपस्थित होते.
संबंधित शैक्षणिक संस्था आणि ते चालवत असलेले महाविद्यालय याच्या अनुषंगाने ग्रामस्थांनी माध्यमांना माहिती दिली. विद्यापीठ अनुदान आयोग प्रायोजित अभ्यासक्रमांतर्गत जे अभ्यासक्रम चालू करण्यात आले, त्यातून विद्यार्थ्यांची दिशाभूल झाल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करूनही त्यांना विद्यापीठाची प्रमाणपत्रे अद्याप दिली नाहीत, अशी माहिती देऊन याबाबत संबंधित पाल्यांच्या पालकांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. हाच धागा पकडून स्थानिक नागरिकांनी आपण संबंधित विद्यार्थी आणि पालकांसोबत ठाम उभे राहून यातून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासित केले.
यावेळी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शैक्षणिक संस्थेवर प्रशासक नेमण्याची स्थानिक नागरिकांनी शासनाकडे मागणी केली आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन तसेच शिक्षण संचालक (उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे) यांच्या निर्देशानुसार उच्च शिक्षण कोकण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबत तक्रारदार ग्रामस्थांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी तसेच संबंधित महाविद्यालयाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी नुकतीच महाविद्यालयाला भेट दिली. त्यावेळी तक्रारदारांसह काही पालकही उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयावर प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी करणाऱ्या मुख्य तक्रारदारांपैकी मुख्य तक्रारदार प्रकाश लळीत यांनी विद्यमान संचालकांच्या मान्यतेबाबतही प्रश्‍न उपस्थित करून महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याची मागणी करीत असल्याचे स्पष्ट केले. महाविद्यालयाला गेली सुमारे आठ वर्षे नियमित प्राचार्य नियुक्त केले नसल्याकडेही ग्रामस्थांनी लक्ष वेधून यातून शैक्षणिक दर्जा ढासळण्याची भीती व्यक्त केली. याच संस्थेद्वारे चालविले जाणाऱ्या अन्य एका महाविद्यालयाचे कामकाजही नियम धाब्यावर बसवून सुरू असल्याचे सांगण्यात आले. महाविद्यालयात आजच्या घडीला प्राचार्य तसेच प्राध्यापकांना विद्यापीठाची मान्यता घेतलेली नाही. विद्यार्थ्यांना केवळ प्रवेश दिला जात असून थेट परीक्षेला बसू दिले जात असल्याचे सांगून अशा प्रकारे संबंधित अध्यापक महाविद्यालय सर्व नियमांचा भंग करून चालविले जात असल्याची तक्रार यावेळी मांडण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com