मडुरा पुलावरील वीजवाहिनी धोकादायक

मडुरा पुलावरील वीजवाहिनी धोकादायक

87565

मडुरा पुलावरील वीज वाहिनी धोकादायक

अपघाताची भीती ः उंची वाढविली तरी वाहिन्या तिथेच

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः मडुरा हनुमान मंदिरजवळील नवीन बांधकाम केलेल्या पुलावरील विद्युत वाहिनी वाहनांना घर्षण करत आहे. पुलाची उंची वाढल्याने सद्यस्थितीत वीज वाहिनी धोकादायक ठरत आहे. रविवारी सायंकाळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला विद्युत वाहिनीचा स्पर्श झाला; मात्र सुदैवाने अनर्थ टळला. सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणच्या दुर्लक्षामुळे भविष्यात दुर्घटना घडू शकते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ, प्रवासी, वाहनचालकांमधून होत आहे.
मडुरा येथे सुरू असलेल्या पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. या पुलावरून रविवारपासून (ता. २) घाई गडबडीत वाहतूक सुरू झाली; मात्र अन्य धोकादायक स्थितीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले. अवजड मोठ्या वाहनांना घासणाऱ्या विद्युत वाहिनीसाठी उंच खांब उभारणे आवश्यक होते; परंतु याकडे महावितरण अथवा बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बांदा कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने विद्युत खांब बदलून वाहिनी सुरक्षित करण्यात येणार आहे. तशा सूचना ठेकेदारास दिल्याचे यादव यांनी सांगितले.
..............
चौकट
घाईगडबड कशासाठी?
बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा येथील पुलाचे काम पूर्णत्वास आले; मात्र बाजूला असलेल्या विद्युत खांबाची उंची वाढविण्याचा विसर पडला. कोणतीही सुरक्षा न बाळगताच पूल वाहतुकीस खुला करण्यात आला. येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाची पर्वा न करता घाईगडबडीत पूल वाहतुकीस नेमका कशासाठी खुला झाला, असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.
..............
कोट
हा धोका टाळण्यासाठी ठेकेदाराचे याकडे लक्ष वेधले आहे. अगोदर पुलावरून जाणारी विद्युत वाहिनी सुरक्षित करा; अन्यथा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांना जबाबदार धरले जाईल.
- विजय वालावलकर, माजी सरपंच, मडुरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com