सुनील तटकरे, अनंत गीतेंचा आज फैसला

सुनील तटकरे, अनंत गीतेंचा आज फैसला

सुनील तटकरे, अनंत गीतेंचा आज फैसला

रायगड मतदारसंघ ; तटकरेंच्या विजयाचे दापोलीत बॅनर
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ३ ः रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) होणार असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली दिसत आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता असून दापोलीत दिवसभर यावर चर्चा सुरू आहे.
लोकसभेच्या निकालापूर्वीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातातील दापोली येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सुनील तटकरे यांचे प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल अभिनंदन असा फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साधना बोथरे यांनी लावला आहे. यावेळी अतिशय चुरशीची लढत झाल्याने कोणीचं ठामपणे निकाल सांगू शकत नाही. यातच रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com