एशियन लाठीकाठी स्पर्धेत पिसईच्या आयुषीला सुवर्ण

एशियन लाठीकाठी स्पर्धेत पिसईच्या आयुषीला सुवर्ण

-rat३p२६.jpg-
२४M८७५७५
आयुषी काटकर
----------

एशियन लाठीकाठी स्पर्धेत पिसईच्या ‘आयुषी’ला सुवर्ण

दापोलीच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा; गोवा येथे स्पर्धेचे आयोजन


सकाळ वृत्तसेवा

हर्णै, ता. ३ ः दापोली तालुक्यातील पिसईच्या आयुषीने साऊथ एशियन लाठी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून दापोलीच्या शिरपेचात रोवला मनाचा तुरा रोवला आहे.
पाकिस्तान, नेपाळ, भुटान, बांग्लादेश आणि श्रीलंका हे खेळात पारंगत देश आहेत. या देशांना साऊथ एशियन लाठी चॅम्पियनशिपमध्ये पिसईतील आयुषी काटकरने पराजित करून भारताचे नेतृत्व करत सुवर्णपदक मिळवले. ही स्पर्धा गोवा येथे झाली.
पिसई गावातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली आयुषी पाचवीपासून लाठीकाठीच्या कलेत निपुण आहे. आता ती दहावीत आहे. आजवर तिने तीन कास्य आणि तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. त्यासोबतच २०२३ मध्ये राष्ट्रीय लाठी निर्णायक पंच या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ती नॅशनल रेफरीही बनली आहे. आयुषी हिच्यात असलेले लाठी कलेचे कौशल्य वडील राकेश काटकर आणि आई सारिका काटकर यांना समजले. त्यांनी तिची आवड जोपासली आणि तिच्या शिक्षणाला या खेळाची जोड दिली. त्यामुळे आयुषीने शिक्षणासह लाठीकाठी खेळात प्राविण्य मिळवले. याच पिसई गावातील नीलेश उजाळ याचा दिल्ली बोर्डाच्या सातवीच्या पुस्तकात मराठी अभ्यासक्रमात २०२३ मध्ये धडा घेण्यात आला होता. त्यामुळे पिसई गाव हे सतत देश पातळीवर चमकत आहे.
----------
कोट
आई-वडिलांनी मुलांच्या कलागुणांना दाद दिली पाहिजे. शिक्षणाबरोबर कलागुण तितकेच महत्वाचे आहेत. कला असेल तर माणूस कधीही मागे पडणार नाही. त्यामुळे पालकांनी मुलांमधील कला गुणांना चालना द्यावी.
--नीलेश उजाळ, लेखक व कवी, पिसई
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com