गॅस पाईप फुटला

गॅस पाईप फुटला

एमआयडीसीत सीएनजी गॅस पाईप फुटला

७०० किलो गॅस वाया ; आगीचा धोका नाही, कंपनीची तत्परता

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : महानगर सीएनजी गॅस कंपनीचा एमआयडीसीमध्ये अचानक पाईप फुटल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. लोकामध्ये भीती पसरली, परंतु काही मिनिटात कंपनीनेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सेफ्टीव्हॉल बंद करून गळतीवर नियंत्रण मिळविले. यामध्ये सुमारे ७०० किलो गॅस वाया गेला. यामुळे कोणताही धोका निर्माण झाला नाही. चार इमारतीतील आणि दोन कंपनीतील घरगुती गॅस काही वेळ खंडित झाला. दोन तासात कंपनीने पुन्हा गॅस पुरवठा सुरळीत झाला.
पूर्वीची अशोका सीएनजी गॅस कंपनी आता महानगर कंपनीच्या ताब्यात आहे. सीएनजी गॅस पाईपने घराघरात पोहचविण्याचे काम कंपनीने केले आहे. शहरातील एमआयडीसीसह शहरातील अनेक भागात पाईपने गॅस पुरविला आहे. अजूनही काही ठिकाणी कंपनीचे काम सुरू आहे. एमआयडीसीतील झिलानी कंपनीसमोर अचानक सीएनजीचा पाईप फुटला. यामुळे सर्वत्र उग्र वास पसरला होता. मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीला याची माहिती दिली. कंपनीचे कर्मचारी काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूचे सेफ्टी व्हॉल बंद केले. त्यामुळे गॅस गळती थांबली.
यामुळे त्या परिसरातील चार इमारती आणि दोन कंपन्यातील गॅस पुरवठा काही तास खंडित झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सीएनजी गॅस सुरक्षित असल्याने कुठेही आग लागण्याचा कोणताही धोका निर्माण झाला नाही. साडेअकरा वाजता कंपनीने पाईपची दुरुस्ती करून पुन्हा गॅस पुरवठा सुरळीत केला. गळतीमध्ये सुमारे ७०० किलो गॅस वाया गेला. दोन तासात गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com