छत्रपती  शिवाजी राजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण वादात

छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण वादात

-rat३p३०.jpg-
P२४M८७६१४
चिपळूण ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुरू असलेले काम.
---------

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण वादात

८८ लाखांचे काम १ कोटी ३५ लाखांवर ; दगडातही गोलमाल

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः शहरात पालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुरवातीला सुशोभीकरणाच्या कामापोटी विशिष्ठ दगड बसवण्याच्या ८८ लाखांच्या कामाची निविदा १ कोटी ३५ लाखांवर पोहोचली. नव्या दरपत्रकाच्या आधारे या कामात सुमारे ४७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून या प्रकरणी चौकशीची मागणी मुकादम यांनी पत्रकार परिषदेत केली.
शहरातील जिप्सी कॉर्नर येथे पालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जात आहे. तेथे सुशोभीकरण केले जात आहे. याबाबत माजी नगरसेवक यांनी इनायत मुकादम यांनी तक्रार केली आहे. त्याबाबत माहिती देताना ते म्हणाले, या पुतळ्याच्या सभोवताली विशिष्ठ प्रकारचा आकर्षक दगड बसवला जाणार आहे. सुरवातीला या कामाचे अंदाजपत्रक ८८ लाखाचे करण्यात आले होते. मात्र महापुरातनंतर या कामाच्या अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नव्या अंदाजपत्रकात ६ टक्के वाढ करण्यात आली. त्याचबरोबर अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेला दगड प्रत्यक्षात बसविण्यात आलेला नाही. सदरचे दरपत्रक १५ जून २०२२ ते २२ मे २०२२ दरम्यान मागविण्यात आले. प्रत्यक्षात पालिकेस प्राप्त झालेल्या या तिन्ही निविदा एकाच दिवशी २ ऑगस्ट २०२२ ला संबंधितांनी सादर केल्या. दरपत्रकाच्या या तिन्ही निविदा कोल्हापूर येथील असून एकाच दिवशी त्या पालिकेस जमा केल्याने संशय आहे. मंजूर केलेल्या ठेकेदाराने नियमानुसार भविष्यनिर्वाह निधी प्रमाणपत्र अद्याप पालिकेस अदा केलेले नाही. मुळात निविदा प्रक्रियाच वादग्रस्त करण्यात आली. दरपत्रकावर जीएसटीची नोंद ५ टक्के आहे. तर अंदाजपत्रकात १८ टक्के दाखविण्यात आली. १ कोटी ३५ लाखांच्या कामाचा ठेका पुण्यातील एका ठेकेदार कंपनीस देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातून आणलेल्या दगड योग्य प्रतिचा नाही. या पूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांनी व बांधकामच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केले आहे. वाढीव अंदाजपत्रकात नमुद केलेले ६ टक्के जीएसटी वाढीचे कारण संयुक्तीक वाटत नसल्याचे मुकादम यांनी स्पष्ट केले.
--
जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी
छत्रपती शिवाजी महाराज ही सर्व जनतेची अस्मिता आहे. त्यामुळे या कामाला विरोध नाही. मात्र शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात होणाऱ्या गैरव्यवहाराला आमचा विरोध असून जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी केली असल्याचे मुकादम यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com