रस्ता कामातील स्टील चोरीस

रस्ता कामातील स्टील चोरीस

रस्ता कामातील
स्टील चोरीस
चिपळूणः मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत सुरू असलेल्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी फरशी तिठा येथे ठेवण्यात आलेले ३०० किलो स्टील चोरीला गेल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आलम खुरशेद अली शेख (वय २६, मूळ रा. कोलकत्ता), नुरआलम हासमद्दीन शेख (२०, मुळ रा. झारखंड) व सोलीम रिटी शेख (२६, मुळ रा. कोलकत्ता, सध्या सर्व रा. पेढे) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. याबाबत प्रेमप्रकाश रामाशंकर सिंग कुसवाह (३२, रा. कामथे) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित कंपनीचे ३०० किलो स्टीलच्या सळ्या संरक्षक भिंतीच्या कामासाठी आणून ठेवल्या होत्या. मात्र शेख व त्याच्या दोन्ही सहकाऱ्यांनी तेथून स्टील चोरीच्या उद्देशाने उचलून समोरील भंगार व्यावसायिकाच्या ठिकाणी ठेवले.
------------
अलोरेत ताडी माडी
विक्रेत्यावर कारवाई
चिपळूणः अलोरे देऊळवाडी येथे बेकायदा ताडी माडी विक्री करणाऱ्या दोघांवर शिरगांव पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एक लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकरणी सुनील धोंडू शिंदे (६३, वर्षे रा. अलोरे देऊळवाडी) व शंकर गंगाराम ताम्हणकर (६१, रा. अलोरे देवरेमार्केट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांचा नावे आहेत. या घटनेची फिर्याद पोलिस कर्मचारी जगन्नाथ दिनकर चव्हाण यांनी दिली आहे. सुनील शिंदे व शंकर ताम्हणकर यांनी ताडी माडी विक्रीसाठी वापरलेले साहित्य देखील जप्त केले आहे. सुमारे २०० लिटर मापाचे १० बॅरेल व त्यामध्ये प्रत्येक २०० लिटर ताडी माडी असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दुसऱ्या ठिकाणाहून ३०० लिटर मापाच्या प्लॅस्टिकच्या ३ टाक्या व त्यामध्ये ३०० लिटर ताडी माडी असा ३२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल त्याशिवाय २० लिटर मापाचे प्लास्टिकचे ५ कॅन, बादल्या, पांढऱ्या रंगाचे पुनेल व अन्य साहित्य जप्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com