तुळस येथे शनिवारी
महारक्तदान शिबिर

तुळस येथे शनिवारी महारक्तदान शिबिर

तुळस येथे शनिवारी
महारक्तदान शिबिर

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३ ः वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्यावतीने सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गेल्या आठ वर्षांमध्ये सलग २४ रक्तदान शिबिरे घेण्यात आली. याअंतर्गत शनिवारी (ता. ८) रक्तदान शिबिरांची रौप्य महोत्सवी वाटचाल करताना २५ व्या महारक्तदान शिबिराचे आयोजन गोवा मेडिकल कॉलेज रक्तपेढीच्या सहकार्याने केले आहे. हे महारक्तदान शिबिर उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे सकाळी ९.०० वाजता होणार आहे.
या शिबिरासाठी सहयोगी संस्था म्हणून तुळस ग्रामपंचायत, तुळस जैतिराश्रित संस्था मुंबई, सातेरी महिला मंडळ तुळस, चिंतामणी प्रतिष्ठान वेंगुर्ले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक), कुंभारटेंब युवक कला क्रीडा मंडळ तुळस, झेंडोबा कला, क्रीडा मंडळ पाल, गुरुकुल संगीत शिक्षण संस्था, न्हावेली, देसी बॉयज क्रिकेट संघ होडावडा आदींचे सहकार्य लाभले आहे. यावेळी ज्या रक्तदात्यांनी प्रतिष्ठानच्या मागील २४ रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान करून सहकार्य केले, अशा सुमारे ३०० जणांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. वेंगुर्ले तालुक्यात ज्या संस्था, मंडळे सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित करून आरोग्य क्षेत्रात मोलाची भूमिका बजावत आहेत, अशा निवडक रक्तदान शिबिर आयोजक संस्थांचाही सन्मान केला जाणार आहे. महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त जणांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे तसेच सन्मानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com