राणे की राऊत आज फैसला

राणे की राऊत आज फैसला

राणे की राऊत आज फैसला

राज्याचे लक्ष; दोघांचेही विजयाचे ढोल तयार

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : राज्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल उद्या (ता. ४) जाहीर होणार आहे. ९ उमेदवार रिंगणात असले तरी खरी टक्कर महाविकास आघाडीतील उबाठाचे उमेदवार विनायक राऊत आणि महायुतीचे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, दुपारी ३ पर्यंत ती संपेल. त्यामुळे उद्या कोण बाजी मारणार याची प्रचंड उत्सुकता आहे. रत्नागिरी शहरामध्ये राणे आणि राऊत या दोघांचेही विजयाचे ढोल तयार आहेत.
विनायक राऊत यांनी मराठा भवन, काही हॉटेल बुक केली आहेत. मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल झाले आहेत. तर नारायण राणे यांच्या महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले आहे. त्यांनीही अनेक हॉटेल्स, लॉज बुक केले आहेत. दोन्ही उमेदवारांना निवडून येण्याचा विश्वास असल्याने ही तयारी केली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे. उद्या (ता. ४) सकाळी ६ वाजता टपाली मतपत्रिकांची वाहतूक जिल्हा कोषागार कार्यालयातून मतमोजणी ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा संघनिहाय एकूण १४ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे. चिपळूण विधानसभेमध्ये एकूण ३३६ मतदान केंद्रांमध्ये २४ फेऱ्या, रत्नागिरी विधानसभेमध्ये एकूण ३४७ मतदान केंद्रांमध्ये २५ फेऱ्या, राजापूरमध्ये ३४१ मतदान केंद्रांमध्ये २५ फेऱ्या, कुडाळमध्ये २७८ मतदान केंद्रांवर २० फेऱ्या, कणकवली ३३२ केंद्र २५ फेऱ्या तर सावंतवाडी ३०८ निवडणूक केंद्रांमध्ये २२ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीसाठी १ हजार १५८ इतक्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक उमेदवाराचे ९९ प्रतिनिधी उपस्थित असतील. एक फेरी साधारण ६० हजारांवर मतांची मोजणी होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.०४ टक्के मतदान झाले होते. एकूण ९ लाख ७६ हजार ६१८ जणांनी मतदानाचा अधिकार नोंदवला होता.

---------------

चौकट
निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार

* विनायक भाऊराव राऊत (महाविकास आघाडीचे उबाठा)
* नारायण तातू राणे (महायुतीचे उमेदवार )
* राजेंद्र लहू आयरे (बहुजन समाज पार्टी)
* शकील अब्दुल करीम सावंत (अपक्ष)
* अमृत अनंत तांबडे (अपक्ष )
* सुरेश गोविंदराव शिंदे (सैनिक समाज पक्ष)
* विनायक लवू राऊत (अपक्ष)
* मारुती रामचंद्र जोशी (वंचित आघाडी)
* अशोक गंगाराम पवार (बहुजन मुक्त पार्टीचे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com