सिंधुदुर्गात पोलिस यंत्रणा सज्ज

सिंधुदुर्गात पोलिस यंत्रणा सज्ज

सिंधुदुर्गात पोलिस यंत्रणा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३ ः लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी उद्या (ता. ४) होणार असून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, तसेच देशातील इतर मतदारसंघांचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शांतता राहावी, याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी फिक्स पॉईंट, नाकाबंदी, पोलिस वाहन पेट्रोलिंग असा बंदोबस्त नेमला आहे. संवेदनशील गावांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणी निकालाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ अपर पोलिस अधीक्षक, ३ पोलिस उपअधीक्षक, ४१ इतर पोलिस अधिकारी व ३१९ पोलिस अंमलदार असा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच ४ स्ट्रायकिंग, २ दंगल नियंत्रण पथके सज्ज आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ४६९ व्यक्तींवर विविध कलमांन्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, तर ४३३ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यात येत असून, आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अवैध दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी चेकपोस्टवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात आहे. जिल्ह्यात १३ जूनपर्यंत मनाई आदेश लागू आहेत. तसेच आदर्श आचारसंहिताही लागू आहे. मतमोजणी व निवडणूक निकालाच्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वांनी शांतता राखावी, संयम ठेवावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com