रामा ठाकूर यांना समाजभूषण पुरस्कार

रामा ठाकूर यांना समाजभूषण पुरस्कार

रामा ठाकूर यांना
समाजभूषण पुरस्कार
कुडाळः सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज संघटनेमार्फत दिला जाणारा वसंतराव गंगावणे ठाकर समाजभूषण पुरस्कार रामा ठाकूर (कोनाळकट्टा, ता. दोडामार्ग) यांना मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी व कातळशिल्प संशोधक डॉ. सतीश लळीत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे होते. शनिवारी (ता. १) हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज मंडळाचे अध्यक्ष भगवान रणसिंग, पत्रकार शेखर सामंत, मंडळाचे माजी अध्यक्ष भास्कर गंगावणे, बाळा म्हस्के, सहसचिव उर्मिला यादव, पिंगुळी उपसरपंच सागर रणसिंग, मंडळाचे सचिव दिलीप म्हस्के आदींसह उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा आदिवासी गिरीजन सांस्कृतिक पुरस्कार गणपत मसगे व सुरेश रणसिंग यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. समाजभूषण पुरस्कार प्राप्त रामा ठाकूर यांनी मनोगतात पुरस्कार दिल्याबद्दल सर्व समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सतीश लळीत यांनी अध्यक्षीय मनोगतात ठाकर लोककलांतील पारंपरिकता जतन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन विजय ठाकर यांनी, तर प्रास्ताविक सचिव दिलीप म्हस्के यांनी केले. आभार विवेकानंद गंगावणे यांनी मानले.
---------------
इस्वोटी वर्धापन दिन
सातार्ड्यात उत्साहात
सावंतवाडीः सातार्डा-केरकरवाडा येथील श्री देव इस्वोटी देवाचा वर्धापन दिन सोमवारी (ता. ३) झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अभिषेक व श्रींची महापूजा झाली. या पूजेचा मान निवृत्त शिक्षक धनंजय केरकर उभयतांना मिळाला. दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी स्थानिक मंडळाचे भजन व आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांचा ईस्वोटी मंदिर येथे ‘कृपा त्या इस्वोट्याची’ नाट्यपुष्प सादर झाले. भाविक भक्तांनी तसेच नाट्य रसिकांनी केरकरवाडी इस्वोटी मंदिर परिसरात गर्दी केली होती.
................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com