शेतीत सेंद्रिय खतांचा वापर वाढवा

शेतीत सेंद्रिय खतांचा वापर वाढवा

87785

शेतीत सेंद्रिय खतांचा वापर वाढवा
रेश्मा तुळसकरः वेर्लेत शेतकरी प्रशिक्षण मेळाव्यास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ः सेंद्रिय खत उपलब्ध नसेल तर शिफारशीत दिलेल्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषी सहाय्यक रेश्मा तुळसकर यांनी वेर्ले येथे आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षण मेळाव्यात केले.
महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय सावंतवाडी व जनसेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्यावतीने बीज प्रक्रिया मोहीम पंधरवडा निमित्ताने या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक यांनी तुळसकर यांनी भात बीज प्रक्रिया, उगवण क्षमता चाचणी व ‘श्री’ पद्धतीने भात लागवड या बाबतीत प्रात्यक्षिकासह तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी श्री पध्दतीने भात लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना रत्नागिरी - ८ भात बियाण्याचे मान्यवरांच्या हस्ते बीज वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रुचिता राऊळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच मोहन राऊळ, ज्येष्ठ नागरिक गोविंद लिंगवत, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, सामाजिक कार्यकर्ते जानदेव लिंगवत, प्रगतशील शेतकरी लाडजी राऊळ, पोलिसपाटील अरुण लिंगवत आदी उपस्थित होते.
शेतकरी प्रशिक्षण मेळाव्यात लाडजी राऊळ, रत्नमाला राऊळ, सत्यवान लिंगवत, रामा राणे, गोपाळ राणे, अर्जुन राऊळ, देवकी राऊळ, अरविंद लिंगवत, दशरथ लिंगवत, रामा लिंगवत, व्दारका लिंगवत, विजय राऊळ, सांबा राऊळ यांना बियाणे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात मोहन राऊळ, विष्णू मेस्त्री, अनिल गावडे, लक्ष्मी गावडे, अशोक गोसावी, संतोष लिंगवत, अनंत लिंगवत, अनिल लिंगवत, विठ्ठलराव लिंगवत, शांताराम राऊळ, संदीप राऊळ, रामचंद्र चव्हाण, सत्यवान लिंगवत, विश्राम लिंगवत, शांताराम राऊळ, वसंत मोरजकर, रामा लिंगवत, गोपाळ राणे, मधुकर लिंगवत, सत्यवान राऊळ, सीताबाई राऊळ, सीताबाई सावंत, पंकज घोगळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जानदेव लिंगवत यांनी सूत्रसंचालन, स्वागत डॉ. संजीव लिंगवत यांनी केले. आभार प्रदर्शन वसंत मोरजकर यांनी केले.

चौकट
‘एसआरआय’ पध्दत लागवडीस लाभदायी
एस. आर. आय. पद्धतीने भात लागवड करताना ८ ते १२ दिवसांच्या रोपांची लागवड केली जाते. त्यामुळे मुळांचा चांगला विकास होऊन ३० ते ५० फुटवे मिळतात. एसआरआय (सिस्टीम ऑफ राइस इंटेन्सिफिकेशन) या पद्धतीद्वारे रोपे, माती, पाणी आणि पोषक द्रव्ये यांचे व्यवस्थापन बदलून सिंचन केलेल्या भाताची उत्पादकता वाढविली जाते. साधारणपणे भारतात एका एकरातून २५ ते ३० क्विंटल भात प्रमाणित पद्धतीनुसार मिळू शकते; तथापि संकरित बियाणे आणि तांदूळ तीव्रतेची पद्धत (एसआरआय) घेतल्यास ते ५० ते ६० क्विंटलपर्यंत जाऊ शकते, अशी माहिती यावेळी कृषी सहाय्यक तुळसकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com