राणेंच्या विजयाचा जिल्ह्यात जल्लोष

राणेंच्या विजयाचा जिल्ह्यात जल्लोष

87797
87805
87802
--

राणेंच्या विजयाचा जिल्ह्यात जल्लोष

सावंतवाडीत भाजप, शिंदे शिवसेनेतर्फे आनंद, कणकवलीतही घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या समर्थकांकडून महायुतीचे लोकसभेचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून नारायण राणेंना मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख बबन ऊर्फ नारायण राणेंनी व्यक्त करत नारायण राणे पुन्हा केंद्रात मंत्री होतील, असा दावा केला.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेली मेहनत पाहता सावंतवाडी मतदारसंघातून नारायण राणेंना सर्वाधिक मताधिक्य मिळाले. सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा विजय निश्चित होता. विजयात वाटा असलेल्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानत असल्याचे तालुकाप्रमुख बबन राणे म्हणाले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, गजानन नाटेकर, किरण नाटेकर, शर्वरी धारगळकर, विश्वास घाग, गुंडू जाधव, नंदू गांवकर, सुजित कोरगावकर, शैलैश मेस्त्री, सुभाष गावडे, दया परब, सदा कदम, संजय गावडे, नाना वारंग, विनायक महाडेश्वर आदी उपस्थित होते.

सावंतवाडीत भाजपचा जल्लोष
सावंतवाडी ः महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या मताधिक्यानंतर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत मतदारांना धन्यवाद दिले.
सावंतवाडीतून सर्वाधिक मताधिक्य नारायण राणेंना मिळेल, असा विश्वास गोंदावळे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, नीलेश राणे, मंत्री उदय सामंत, किरण सामंत, आमदार शेखर निकम आदींचे त्यांनी आभार मानले. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे गोंदावळे म्हणाले. यावेळी भाजप शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, अॅड. संजू शिरोडकर, संजय नाईक, निशांत तोरसकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, ओंकार सावंत, निखिल सावंत, सौरभ सावंत आदी उपस्थित होते.
--
चौकट
कणकवलीतील कार्यकर्ते आनंदात न्हाले
कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भरघोस मताधिक्याने विजयी झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी आज येथे जल्लोष केला. बहुतांश कार्यकर्ते रत्नागिरीकडे असले तरी येथे असलेल्या काही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणा देत राणेंच्या विजयाने आनंदात न्हाऊन गेल्याचे चित्र होते.
लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक राणेंच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मानली गेली होती. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये अटीतटीची लढत दिसून आली. मात्र, निकालाच्या फेऱ्या सुरू झाल्या, तशी विजयाची आकडेवारी वाढत गेली. राणेंना प्रत्येक फेरीमध्ये मताधिक्य वाढत होते. त्यामुळे हळूहळू कार्यकर्ते कार्यालयाजवळ जमू लागले. आज येथे मंगळवारी आठवडा बाजार असला, तरी बाजारपेठेत फारशी गर्दी नव्हती. दुपारनंतर कार्यकर्त्यांची जमवाजमाव झाली. चौकाचौकांमध्ये कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. राणेंच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कणकवली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बबलू सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजप कार्यालयाजवळ आले होते. त्यानंतर येथे मोठी घोषणाबाजीही करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com