निवडणूक निकाल पार्श्वभूमीवर
कणकवलीत कडक बंदोबस्त

निवडणूक निकाल पार्श्वभूमीवर कणकवलीत कडक बंदोबस्त

87827


निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर
कणकवलीमध्ये कडक बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. ४ ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून कणकवली शहरामध्ये पोलिसांनी कडक सुरक्षा ठेवली होती. शहरातील मुख्य चौक, शिवाजी चौक आणि नरडवे नाक्यावर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवला होता. तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक शहरात दिवसभर तैनात केले होते.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवली शहरामध्ये पोलिसांची नेहमीच सावध भूमिका राहिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सुरुवात आज सकाळपासून झाली होती. त्यामुळे जिल्हा पोलिस विभागातर्फे विशेष करून कणकवलीमध्ये अधिक सुरक्षा वाढविली होती. राज्य राखीव दलाच्या काही तुकड्या तैनात केल्या होत्या. तसेच स्थानिक पोलिसांची तीन पथके शहराच्या विविध भागांमध्ये बंदोबस्तासाठी होती. नेहमी वर्दळीचा चौक असलेल्या पटवर्धन चौकामध्ये आज सकाळपासून पोलिस ठाण मांडून होते. तसेच भाजप कार्यकर्त्यांची सातत्याने गर्दी असलेल्या शिवाजी चौकात पोलिसांचे एक पथक तैनात होते. संवेदनशील असलेल्या नरडवे नाक्यावरही विशेष पोलिस तैनात केले होते. तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक दिवसभर शहर आणि परिसरामध्ये घिरट्या घालत होते. कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत व्हावी या दृष्टिकोनातून पोलिसांनी आज सुरक्षा वाढवली होती. राजकीय दृष्ट्या कणकवलीमध्ये सातत्याने वाद होत असतात परंतु, आज भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बहुतांशी कार्यकर्ते आणि प्रमुख नेते हे रत्नागिरीमध्ये होते. त्यामुळे शहर आणि तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांची फारशी गर्दी झाली नव्हती. तरी पोलिसांनी सुरक्षा वाढवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com