कोकण रेल्वेमुळे निवसरची जांभळे सर्वदूर

कोकण रेल्वेमुळे निवसरची जांभळे सर्वदूर

-rat४p३१.jpg-
P२४M८७८४९
निवसर ः निवसर येथे जांभूळ विक्री करणारी महिला.
-------

कोकण रेल्वेमुळे निवसरची जांभळे सर्वदूर

३५ कुटुंबांना हंगामी रोजगार ; दिवसभर स्टेशन परिसरात विक्री

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ४ ः कोकण रेल्वे मार्गावरील लांजा तालुक्यातील निवसर गाव जांभूळ गाव म्हणून नावारूपाला आले आहे. कोकण रेल्वेप्रवासी यांनी निवसरच्या जांभूळ या कोकणी मेव्याला मोठी पसंती दिली आहे. हंगामी रोजगार जांभूळ विक्रीतून निवसरमधील अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
वडिलोपार्जित बहुसंख्य जांभूळ झाडे निसर्गनिर्मित निवसर गावात आहेत. पूर्वी दुर्लक्षित असलेली जांभूळ कोकण रेल्वे धावू लागल्यानंतर निवसरची जांभळे मे महिन्यात उन्हाळी सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमानी, पर्यटक, कोकण रेल्वे प्रवासी यांना भुरळ घातली आहे. कोकण रेल्वेमुळे निवसरची जांभळे सर्वदूर पोहोचली आहेत. या जांभळांची चव रेल्वे प्रवाशांना आवडली आहे. निवसर-शिंदेवाडी, घाटकरवाडी धावडेवाडी आदी परिसरात जांभळाची वडिलोपार्जित अनेक झाडे आहेत. दरवर्षी परिसरातील ३० ते ३५ कुटुंबांना जांभूळ विक्रीतून रोजगार मिळत आहे. औषधी आणि पोषक फळ असल्याने या फळाला मोठी मागणी आहे. दिवसाला जांभूळ विक्रीतून पाचशे ते सातशे रुपये रोज मिळत असल्याची शिंदेवाडीतील आजी सुवर्णा शिंदे यांनी सांगितले. आम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रेल्वे परिसरात असतो. निवसर छोटे स्टेशन असल्याने केवळ क्रॉसिंगच्या वेळी थांबणाऱ्या ट्रेनमध्येच जांभूळ विक्री होते. निवसर येथे दिवा पॅसेंजर ही एकमेव गाडी थांबते. इतर सर्व गाड्या क्रॉसिंगला थांबवल्या जातात. जांभळाच्या झाडामागे ३० ते ४० हजारांचे उत्पन्न मिळत मिळू शकते.
------
मानांकनासाठी प्रयत्न गरजेचे
माजी सरपंच अशोक शिंदे यांनी निवसर येथील जांभळांना भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. निवसर गावात जांभळाची शेकडो झाडे आहेत. नव्याने झाडांची लागवड करण्यासाठी येथील शेतकरी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात नवीन लागवड आणि जांभळाचे उत्पादन आणि फळाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी कृती आराखडा होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
---------
कोट
जांभळाच्या एका झाडापासून हंगामात शेतकऱ्याला सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. मधुमेहावर गुणकारी असल्याने जांभळाचा ज्यूस आणि बियांच्या पावडरला मोठी मागणी असते. उत्पन्नवाढीसाठी जांभळापासून ज्यूस आणि बियांपासून पावडर तयार करण्याकडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

--जयवंत विचारे, कृषिमित्र
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com