-मंत्री रवींद्र चव्हाण यांची भूमिका किंगमेकरची

-मंत्री रवींद्र चव्हाण यांची भूमिका किंगमेकरची

-rat४p३४.jpg-

रवींद्र चव्हाण

मंत्री रवींद्र चव्हाण यांची किंगमेकरची भूमिका

राणेंचा विजय; भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणे यांनी मिळवलेला विजय हा भाजपच्या कोकणातील वाढलेल्या ताकदीचा आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री, पालघर-सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संघटन कौशल्याचा व राजकीय समीकरणांचा आहे. ४० वर्षानंतर कमळाच्या निशाणीवर भाजपने खासदार निवडून आणल्याने भाजप कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांचा उत्साह आज मतमोजणीवेळी भाजपच्या कक्षात पाहायला मिळाला.
रवींद्र चव्हाण यांच्यावर या मतदार संघाची जबाबदारी पक्षाने दिली होती. त्यामुळे उमेदवार घोषित होण्यापूर्वीपासूनच विजय संकल्प मेळावा असो किंवा संघटनकौशल्य, विकासनिधी या माध्यमातून चव्हाण यांनी भाजपची ताकद वाढवली. कार्यकर्त्यांना बळ दिले. रत्नागिरीत सुरवातीला भाजपला अनुकूल परिस्थिती नव्हती. जिल्ह्यात भाजपाची संघटना अजून म्हणावी तशी बळकट नाही. मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची शेवटच्या क्षणापर्यंत संदिग्ध वाटावी अशी तळ्यातमळ्यात घेतलेली भूमिका अशा अनेक आव्हानांना नारायण राणे यांना सामोरे जावे लागले होते.
----------
४७ वर्षांनी भाजपचा विजय
आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनसंघाच्या अॅड. बापुसाहेब परूळेकर यांनी काँग्रेसच्या शांताराम पेजे यांचा २५ हजार ३०० मतांनी पराभव केला होता. त्यानंतर प्रथमच भाजपच्या कमळ चिन्हावर जवळपास ४७ वर्षांनी उमेदवार राणे विजयी झाले. राणे यांच्यासमोर विद्यमान खासदार विनायक राऊत यांचे आव्हान होते शिवाय कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना तिथे विजयी मिळवून राणे यांनी ताकद दाखवून दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com