राणेंच्या विजयाने दोडामार्गात जल्लोष

राणेंच्या विजयाने दोडामार्गात जल्लोष

87949

राणेंच्या विजयाने दोडामार्गात जल्लोष
शिंदे शिवसेनाः गांधी चौकात आतषबाजी
सकाळ वृत्तसेवा 
दोडामार्ग, ता. ४ : लोकसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण राणे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या विजयाचा आनंदोत्सव दोडामार्ग तालुक्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. येथील गांधी चौकात फटाक्यांची आतषबाजी करत नारे लगावले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, उपतालुकाप्रमुख बाबाजी देसाई, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, शहरप्रमुख योगेश महाले, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, दोडामार्ग व्यापारी संघ अध्यक्ष सागर शिरसाट यांसह तिलकांचन गवस, मायकल लोबो, रामदास मेस्त्री, गोकुळदास बोंद्रे, प्रवीण गवस, संदीप गवस, संजय गवस, लाडू आयनोडकर, सुमित गवस, सूर्यकांत गवस, विठोबा पालयेकर, गुरुदास सावंत, विलास सावंत, शीतल हरमळकर, सानवी गवस, मनीषा दळवी, विठू शेटये आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट
भाजप कार्यकर्ते रत्नागिरीत
आज लोकसभा निवडणूक निकालादिवशी दोडामार्ग तालुक्यातील काही भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते थेट रत्नागिरीत गेले होते. त्यांनी नारायण राणे यांच्या विजयानंतर त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. 

चौकट
चर्चा फोल ठरली 
लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेनंतर अनेक ठिकाणाहून विजयी उमेदवाराच्या जोरदार चर्चा मतदारांतून सुरू होत्या. ठिकठिकाणी पैजा देखील लावण्यात आल्या होत्या. राणे की राऊत अशी चर्चा सुरू असताना अग्रक्रमाने विनायक राऊत विजयी होतील, अशी चर्चा नाक्यानाक्यावर सुरू असायची. अशी चर्चा ऐकून खरंतर कार्यकर्ते देखील विनायक राऊतच विजयी होतील, या निर्णयावर होते; मात्र नारायण राणे यांना मिळालेले लीड व त्यांचा झालेला विजय पाहता महिनाभर चाललेली ही चर्चा फोल ठरली. 

कोट
नारायण राणे हे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांचे कार्यसम्राट आहेत. त्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. ते जनतेच्या मनामनात बसलेले आहेत. त्यामुळे अशा या कार्यसम्राटाचा विजय निश्चित होता आणि तो झाला. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीमुळे राणे विजयी झाले आहेत. 
- एकनाथ नाडकर्णी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष 

कोट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या माध्यमातून नारायण राणे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून दिलेली संधी आणि राणे यांनी केलेली कामगिरी ही आजच्या त्यांच्या विजयाची पोचपावती आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे या मतदारसंघातील योगदान, रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात भाजप वाढविण्याचे प्रमोद जठार यांनी केलेले काम आदींच्या श्रेयामुळे आज विजय मिळाला आहे. त्यामुळे निश्चितच विकासाची लाट रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. 
- भाजप जिल्हा उपाध्यक्ष, राजेंद्र म्हापसेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com