-सहा किलो गांजा आला कुठून

-सहा किलो गांजा आला कुठून

-ratchl४२.jpg ः
२४M८७९४०
चिपळूण ः गांजाप्रकरणी पानटपऱ्यांची तपासणी करताना चिपळूणचे पोलिस.
-----------

गांजा प्रकरणातील सूत्रधार पडद्याआड

खेर्डीतील सहा किलो गांजा प्रकरण; महिलेचा मोबाईलसह जप्त

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः खेर्डी येथे गांजाविक्रेता सापडल्यानंतर सावर्डे येथून गांजा पुरवठा करणाऱ्या संशयित मिनाक्षी जयस्वाल हिच्याकडून सुमारे ६ किलो गांजा जप्त केला; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात तिने हा गांजा कोठून आणला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. संबंधित महिलेचा मोबाईल व अन्य साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी मुख्य सुत्रधारापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आलेले नाही.
सावर्डे खोतवाडी येथील रहिवासी असलेली मिनाक्षी जयस्वाल हिच्या घरातून १ लाख १८ हजार १६० रुपये किंमतीचा तब्बल ५ किलो ९०८ ग्रॅम वजनाचा गांजा सावर्डे पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर जयस्वाल हिला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत आणखी दोन दिवसांची कोठडी सुनावली. संबंधित महिलेला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्या आधी तिची कसून चौकशी केली जात आहे. त्याकरिता तिचा मोबाईल व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले असून, त्या आधारे तपास केला जात आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही पडद्याआड आहे. ६ किलो गांजा घरात ठेवून ती विविध ठिकाणी पानपट्टीधारक व अन्य विक्रेत्यांना पुरवत होती. त्यामुळे या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. अशावेळी संबंधित महिलेच्या चौकशीत कोणती माहिती पुढे येते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com