मतदार संघावर महायुतीचे वर्चस्व अबाधित

मतदार संघावर महायुतीचे वर्चस्व अबाधित

-rat४p४१.jpg -
२४M८७९३९
दापोली मतदार संघ
--------------
दापोली- मंडणगड विधानसभा वार्तापत्र--लोगो

मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व अबाधित

तटकरे विजयी ; कोकणात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नवसंजीवनी

सिद्धेश परशेट्ये ः सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ४ : रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सुनील तटकरे यांनी मैदान मारले. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माजी मंत्री अनंत गीते यांचा त्यांनी पराभव केला आहे. तटकरे यांच्या विजयामुळे कोकणात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळणार आहे‌. दापोली विधानसभा मतदार संघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचीदेखील ताकद विरोधी पक्षांना आजमवायला मिळाली. या निवडणुकीत तटकरेंचा झालेला विजय हा दापोली विधानसभा मतदार संघावर महायुतीचे वर्चस्व अबाधित राहिल्याचा एक दाखला देऊन जातो.
राज्यासह केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानेदेखील आपले नाणे किती खणखणीत आहे हे देखील विरोधी पक्षांना दाखवून दिले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे दापोली विधानसभा मतदार संघांमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) शिवसेनेचा शिंदे गट व आरपीआय आठवले गट यांच्यासह अन्य घटक पक्षांनी महायुती म्हणून एकत्र येत निवडणूक लढवली तर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासह अन्य घटक पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येत निवडणूक लढवली.
या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागले. मतदार राजाला चिन्ह समजून पटवून देताना उमेदवारांसह त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची एकच दमछाक उडालेली पाहायला मिळाली. असे असताना देखील माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदार संघावर विजयी पताका फडकवली आहे. सलग पाचव्या फेरीपासून अगदी शेवटच्या फेरी पर्यत तटकरेंनी आघाडीच घेतली होती. प्रचारातसुद्धा तटकरेंची आघाडी पाहायला मिळाली. अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा तटकरेंनी प्रयत्न केला होता. त्याचे फलित म्हणजे हा विजय.
महाविकास आघाडीचा उमेदवार गीते हे नवखे नव्हेत; परंतु त्यांचा काही ठिकाणी तळागाळातील मतदारांशी थेट संपर्क होऊ शकला नाही. महाविकास आघाडीला नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबवताना अनेक अडथळ्यांना कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पर्यायाने मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला वातावरण पोषक असून सुद्धा पराभवाला सामोरे जावे लागले.
-------------------
चौकट
सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांशी स्नेह
तटकरे यांनी गेल्या पाच वर्षात रायगड लोकसभा मतदार संघांमध्ये केलेली विकासकामे आणि त्यांचा सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांशी असलेला स्नेह त्यांना या निवडणुकीत उपयोगी पडला असेच म्हणावे लागेल. रायगड लोकसभा मतदार संघात झालेला हा महायुतीचा विजय यापुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा कौलच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com