जेसीबीची धडक बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी

जेसीबीची धडक बसून दुचाकीस्वार गंभीर जखमी

88001

जेसीबीची धडक बसून
दुचाकीस्वार गंभीर जखमी
सावंतवाडीतील घटनाः जखमीला गोव्यात हलविले
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ः येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात जेसीबीची धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास येथील कुटीर रुग्णालयासमोर घडली. मनीष महादेव देसाई (वय १९, रा. खासकीलवाडा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून गोवा बांबूंळी येथे हलविण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनीष हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन येथील भोसले उद्यानच्या दिशेने जात होता. तो उपजिल्हा रुग्णालय परिसरात आला. त्या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने नाल्याचे काम सुरु होते. याच दरम्यान जेसीबी चालकाने अचानक जेसीबी महामार्गावर आणला. यावेळी त्या ठिकाणाहून जाणाऱ्या मनीषच्या दुचाकीला जेसीबीची जोरदार धडक बसली व तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली.
यावेळी घटनास्थळी जमलेल्या सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार आणि पोलीस व नागरिकांच्या मदतीने त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर जेसीबी चालकाने पळ काढला होता. यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, दर्शन सावंत, पोलीस राजा राणे, सुनील नाईक, श्री. साटेलकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली; मात्र उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, असे ठाणे अंमलदार ज्योती दुधवडकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com