कमळ फुलल्याने कार्यकर्ते जल्लोषात

कमळ फुलल्याने कार्यकर्ते जल्लोषात

swt411.jpg
87948
रत्नागिरीः येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयानंतर आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी असा जल्लोष केला.

कमळ फुलल्याने कार्यकर्ते जल्लोषात
देवगडात आनंदोत्सवः ठिकठिकाणी फोडले फटाके
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ४ः राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयामुळे भाजपचे प्रथमच कमळ फुलले आणि कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तालुक्याच्या विविध भागात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला, तर भाजपचे प्रमुख कार्यकर्ते रत्नागिरीत विजयी जल्लोष करीत होते.
या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून ‘कमळ’ निशाणीवर प्रथमच नारायण राणे रिंगणात होते. त्यामुळे ही जागा जिंकून भाजपला आजवरची कसर भरून काढायची होती. २०१४ पासून देशात भाजपची सत्ता असली तरीही येथील खासदार मात्र युती धर्माप्रमाणे शिवसेना पक्षाचेच राहिले. त्यामुळे येथील खासदार भाजपचा नाही, याचे कार्यकर्त्यांना मोठे शल्य होते. तत्कालीन शिवसेना पक्षाच्या विभाजनानंतर येथील जागा आपल्याला मिळावी, यासाठी राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गट शिवसेना पक्षातील नेत्यांची, कार्यकर्त्यांची सुरुवातीला इच्छा होती; मात्र शिवसेना दुभंगल्याने येथील जागेसाठी भाजप प्रबळ दावेदार बनला होता. लोकसभा मतदारसंघाबरोबरच सिंधुदुर्गातील भाजपची राजकीय ताकद वाढल्याने ही जागा भाजपकडेच राहण्यासाठी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा होती. यातूनच यावेळी प्रथमच या मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे ''कमळ'' निशाणीवर रिंगणात होते. अटीतटीच्या मानल्या गेलेल्या आणि बदलत्या राजकीय पार्श्‍वभूमीवर झालेल्या निवडणुकीत मतदारसंघात भाजपची ''कमळ'' निशाणी प्रथमच विजयी झाली आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांना अधिक आनंद अधिक झाला. याचा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com