खासगी बस-एसटी धडकेत चालक गंभीर

खासगी बस-एसटी धडकेत चालक गंभीर

swt422.jpg
88011
सावंतवाडी ः माजगाव-तांबळगोठण येथे एसटी व खासगी बस यांच्यात अपघात झाला.

खासगी बस-एसटी धडकेत चालक गंभीर
माजगावमधील घटना; तब्बल दीड तास केबिनमध्ये अडकून
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर माजगाव-तांबळगोठण परिसरात आज सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास एसटी व खासगी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात एसटी चालक केबिनमध्ये अडकून पडल्याने गंभीर जखमी झाला. तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालकास बाहेर काढण्यात यश आले. या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी-पणजी एसटी बस येथील स्थानकावरून पणजीच्या दिशेने जात होती, तर खासगी बस ही गोव्याहून मुंबईकडे जात होती. दोन्ही वाहने माजगाव-तांबळगोठण परिसरातील वळणावर आली असता समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, एसटी बसचालक प्रशांत गवस (रा. नेतर्डे) हे केबिनमध्ये अडकले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. पोलिसही तत्काळ दाखल झाले. यावेळी तेथे उपस्थित पोलिस व एसटी बसच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही बस बाजूला करून गवस यांना बाहेर काढले. ते बसच्या केबिनमध्ये अडकल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर, वाहतूक पोलिस राजा राणे, सुनील नाईक, बाळा साटेलकर, दीपक दळवी, रुपेश नाटेकर, सचिन बिर्जे, बाळा कासार, राजू कुबल, चंद्रकांत कासार, आयुष कुबल, माजगाव उपसरपंच बाळा वेजरे, राकेश नार्वेकर, सौरभ कुबल आदींनी बचावकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com