सचिन वीरची गोष्टरंग फेलोशिपसाठी निवड

सचिन वीरची गोष्टरंग फेलोशिपसाठी निवड

-rat५p२.jpg-
P२४M८८१०२
रत्नागिरी ः सचिन वीर
-----

सचिन वीरची ‘गोष्टरंग शिष्यवृत्ती’साठी निवड

नाट्यशास्त्र प्राविण्य पदविका पूर्ण ; १० महिने संपूर्ण भारतभर काम

नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः उत्तम कलाकार बनण्यासाठी तरुण दर्जेदार प्रशिक्षणासाठी पुण्यात, मुंबईत, तसेच दिल्लीतही नाट्य प्रशिक्षण घेतात. तिथे शिकणाऱ्यांना अधिक संधी मिळते असा समज आहे. पण कोकणात नाट्य प्रशिक्षण घेतलेल्या तालुक्यातील कळझोंडी येथील सचिन वीर याची पालघर मधील सामाजिक संस्थेची ''गोष्टरंग'' शिष्यवृत्तीसाठी ( फेलोशिप) निवड झाली आहे. या फेलोशिपसाठी संपूर्ण भारतभर तो काम करणार आहे, अशी माहिती त्याचे अभिनयाचे गुरु रंगशाळा विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप शिवगण यांनी दिली.
सचिन वीरचे आई-वडील शेतकरी. वडील सहदेव वीर यांना नमन आणि जाखडी या दोन्ही लोककलांची खूप आवड. या दोन्ही लोककलांमध्ये ते स्वत: अजूनही शाहीर म्हणून काम करतात. त्यामुळे लहानपणापासून अभिनयाचे बाळकडू मिळाले. बारावी झाल्यावर अभिनय आणि नाटकाचं प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं. रत्नागिरीतील रमेश कीर कला अकादमीत प्रवेश घेतला आणि गुरुवर्य शिवगण यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे आणि नाटकाचे शास्त्रशुद्ध धडे गिरवले. तिथेच अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि त्यानंतर नाट्यशास्त्र प्राविण्य पदविका पूर्ण केली. प्रशिक्षणानंतर कोकणातल्या झाकन्या या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारली.
फेलोशिपबाबत सचिन म्हणाला, क्वेस्ट या पालघरमधील सामाजिक संस्थेचा ''गोष्टरंग'' हा एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी भागातील आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी छोट्या नाटकांचे प्रयोग सादर केले जातात. नाटकाच्या माध्यमातून गोष्टी, पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवली जातात. यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातून ५ ते ६ युवा रंगकर्मींची निवड केली जाते. या फेलोशिपसाठी अर्ज केला. अंतिम फेरीसाठी माझी निवड झाली. महाराष्ट्रातून १६ युवा रंगकर्मी अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. पालघर येथे दोन दिवसांची निवासी कार्यशाळा झाली. यामध्ये विविध विषय देऊन वैयक्तिक आणि सामूहिक नाट्य-सादरीकरणे करण्याची संधी दिली. मुलाखती झाल्या आणि अंतिम ६ रंगकर्मींमध्ये माझी निवड झाली. इथून पुढे १० महिने मी या फेलोशिपसाठी संपूर्ण भारतभर काम करेन.
.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com