राजापूर-साथरोगांच्या प्रतिबंधासाठी आरोग्यपथके

राजापूर-साथरोगांच्या प्रतिबंधासाठी आरोग्यपथके

साथरोगांच्या प्रतिबंधासाठी आरोग्यपथके
आरोग्य विभागाचे नियोजन; काळजी घेण्याचे आवाहन
राजापूर, ता. ५ः पावसाळ्यात फैलावणाऱ्या हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया यांसह अन्य कीटकजन्य साथींना रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासह प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी प्राथमिक आरोग्यकेंद्रनिहाय आरोग्यपथके गठित केली आहेत. साऱ्यांना मान्सूनचे वेध लागले असून, नियमित मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचे संकेत आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर या कालावधीमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया यांसह अन्य साथींचा गढूळ पाण्यामुळे फैलाव होतो. त्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन केले आहे. विविध आजारांच्या साथींचा फैलाव होऊ नये म्हणून लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले आहे.
रोगांना रोखण्यासाठी घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, एक आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठवून ठेवू नये, आठवड्यातून किमान दोनवेळेस पाणीसाठे रिकामे करावेत, टायर्स व निरूपयोगी, भंगार सामान घराबाहेर, छतावर ठेवू नयेत, डासांना पळवून लावण्याऱ्या साधनांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

चौकट
साथीचा प्रादुर्भाव आढळल्यास त्वरित उपचार
तालुक्यातील ओणी, करक, फुपेरे, केळवली, सोलगाव, जैतापूर, जवळेथर, धारतळे, कुंभवडे या नऊ प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकार्‍याच्या मार्गदर्शनाखाली साथरोग पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या पथकामध्ये एका वैद्यकीय अधिकार्‍यासह आरोग्य सहाय्यक आणि सहाय्यिका प्रत्येकी एक, आरोग्यसेवक आणि सेविका प्रत्येकी एक यांचा समावेश आहे. साथीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्यास त्याला तातडीने प्राथमिक आरोग्यकेंद्रामध्ये दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचेही आरोग्य विभागाकडून या वेळी स्पष्ट करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com