विधानसभा लढविण्याचे वरिष्ठांचे आदेश

विधानसभा लढविण्याचे वरिष्ठांचे आदेश

88140

विधानसभा लढविण्याचे वरिष्ठांचे आदेश
संजू परबः सावंतवाडीत मिळालेली मते अनपेक्षित
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः येथील विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक नेतृत्वालाच जनता निवडून देते. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये लढण्याचा आदेश मला माझ्या वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे आजपासून मी तयारीला लागणार आहे, असा दावा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. कणकवली, मुंबई, पुणे, कुडाळातील ‘पर्यटक’ उमेदवार इथे चालणार नाही, असा टोला लगावत त्यांनी स्वपक्षातील इच्छुकांवरही अप्रत्यक्ष टिका केली.
शहरात महायुतीला मिळालेले अत्यल्प मताधिक्य अनपेक्षित आहे. दीपक केसरकर व भाजप एकत्र असताना मोठे मताधिक्य अपेक्षित होते; परंतु अल्पसंख्याक व दलित समाज यांची साथ भाजपला मिळाली नसल्याने आम्हाला मताधिक्य कमी पडले. आगामी काळात ही मते भाजपला का पडली नाहीत ? याच चिंतन करून गैरसमज दूर केले जातील. त्यामुळे भविष्यात हे मताधिक्य वाढलेले दिसेल, असेही ते म्हणाले.
श्री. परब यांनी आज आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी पंचायत समिती सभापती संदीप नेमळेकर, तळवणे सरपंच गोविंद केरकर आदी उपस्थित होते. श्री. परब पुढे म्हणाले, ‘‘सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेने घेतलेल्या अफाट मेहनतीमुळे नारायण राणे यांचा विजय झाला. त्यांच्या रूपाने या मतदारसंघांमध्ये कमळ फुलले. त्यामुळे या लोकांनी नारायण राणेंवर विश्वास दाखवला, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सावंतवाडी शहराचा विचार करता या ठिकाणी स्थानिक आमदार शालेय शिक्षण मंत्री केसरकर व भाजप हे एकत्र असतानाही आम्हाला या ठिकाणी मताधिक्य मिळवता आले नाही, ही केसरकर व भाजपसाठी विचार करणारी गोष्ट आहे. अल्पसंख्यांक समाजाने भाजपला दूर ठेवले तसेच संविधानाबाबत केलेला खोटा प्रचार महायुतीला फायद्याचा ठरला. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात अल्पसंख्यांक जनतेची मते भाजपाच्या विरोधात जाऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील.’’

चौकट
तेली यांना टोला
माझा मडूरा गाव नेहमीच माझ्यासोबत राहिला आहे. ८२ टक्के मतदान येथून झाले आहे. त्यामुळे गावातील लाईट प्रश्नावरून माझ्यावर टीका करणाऱ्यांनी याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही श्री. परब यांनी माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com