सावंतवाडीत शहरात महायुतीची निराशा

सावंतवाडीत शहरात महायुतीची निराशा

सावंतवाडीत शहरात महायुतीची निराशा

अल्प मताधिक्य ः केसरकर यांचे होमपिच

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयात सावंतवाडी विधानसभा मतदार संघाने ३१ हजाराचा मताधिक्य दिले; परंतु स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या होम पिचमध्ये महायुतीला ग्रामीण भागाच्या तुलनेत मतदारांनी नाकारल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणी महायुतीला केवळ १४८ मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
सावंतवाडी शहराचा विचार करता शहरातील मतदारांनी नेहमीच केसरकर यांना साथ दिली आहे. प्रत्येक निवडणुकीची आकडेवारी लक्षात घेता केसरकारांनी केलेल्या आवाहनाला मतदार नागरिकांनी भरभरून दाद दिलेली पाहायला मिळाली आहे. लोकसभा, नगरपालिका किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये शहरात केसरकरांनी आजपर्यंत मोठे मताधिक्य मिळवले आहे; परंतु आत्ताच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर शहरातून महायुतीला केवळ १४८ इतके मताधिक्य पाहायला मिळाले. शहरातून नारायण राणे म्हणजेच महायुतीला ५३९४ तर महाविकास आघाडी म्हणजे विनायक राऊत यांना ५२४६ इतकी मते पडली. या मतांचा विचार करता या ठिकाणच्या मतदारांनी महायुतीला नाकारल्याचे दिसून आले. शहरात एकूण २० मतदान केंद्र होती. या मतदान केंद्राचा विचार करता अल्पसंख्यांक वस्तीतील मतदान केंद्रावर महायुतीला नाकारल्याचे दिसून आले तर अन्य ठिकाणी महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला जास्त मते पाहायला मिळाली. शहरातील अल्पसंख्यांकांचा विचार करता ही मते एकट्या विनायक राऊत यांना पडल्याचे दिसून आले. शहरातील अल्पसंख्यांक जनतेचा विचार करता या जनतेने नेहमीच केसरकर यांना साथ दिली आहे; परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी केसरकर यांना दूर ठेवण्याचे दिसून आले. एकूणच मतदानाचा विचार करता जनतेने महायुतीला येथे नकाराची घंटा दिल्याचे सिद्ध होते. आगामी निवडणुकीचा विचार करता शहरात मिळालेले अत्यल्प मताधिक्य हे महायुतीला निश्चितच आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. येणाऱ्या काळात पालिकेच्या निवडणुकीमध्ये या मतांचे गणित लक्षात घेता केसरकर तसेच भाजपला ही धोक्याचीच घंटा म्हणावी लागेल. त्यामुळे अल्पसंख्यांकांची मते पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी तसेच त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी केसरकर यांच्यासह भाजपला या ठिकाणी पुन्हा एकदा मेहनत घ्यावी लागणार आहे.
----------
पडलेली मते अशी...
बुथ क्रमांक*नारायण राणे*विनायक राऊत
१३२*२८५*४३८
१३३*१२०*७०२
१३४*१३७*३९३
१३५*३७४*२६६
१३६*३५५*२३६
१३७*८८*३६
१३८*४७२*२४१
१३९*३१५*२१२
१४०*४३२*३०३
१४१*३९१*२७३
१४२*१७८*८०
१४३*४३४*२८९
१४४*२०१*१५६
१४५*१८४*१६५
१४६*१९७*१६३
१४७*२८३*२२८
१४८*२११*१५२
१४९*२६१*२२६
१५०*१३५*१९५
१५१*३४१*४२३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com