कुडाळात राणेंच्या विजयाचा
महायुतीकडून आनंदोत्सव

कुडाळात राणेंच्या विजयाचा महायुतीकडून आनंदोत्सव

88139

कुडाळात राणेंच्या विजयाचा
महायुतीकडून आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः येथील गांधी चौकात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. ४) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयाचा फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ‘महायुतीचा विजय असो’, ‘नारायण राणे यांचा विजय असो’, अशा घोषणा दिल्या.
यावेळी महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी आपले राणे यांच्याबद्दलचे गौरवोद्गार काढले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, रत्नाकर जोशी, प्रथमेश धुरी, यतीन माजगावकर, अक्षय जोशी, शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, शिवसेना विभागप्रमुख जयदीप तुळसकर, विठ्ठल शेडगे, शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडोलकर, महिला युवतीसेना तालुकाप्रमुख गायत्री गोलम, शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, महिला आघाडी उपविभागप्रमुख आशू अग्रवाल, शिवसैनिक मयुर अग्रवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com