खेडमध्ये तरुणाला २४ लाखाचा ऑनलाईन गंडा

खेडमध्ये तरुणाला २४ लाखाचा ऑनलाईन गंडा

खेडमध्ये तरुणाला २४
लाखांचा ऑनलाईन गंडा
खेड, ता. ५ : शहरातील एकविरा नगर येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाची तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअरमार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक न करता कंपनीत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी उशिरा अज्ञातावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विक्रांत विजय दांडेकर (४०, रा. एकविरा नगर, खेड) यांनी येथील तक्रार दाखल केली आहे. ही घटना १९ एप्रिल ते २४ मे या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तो फेसबुक अकाउंट चालवत असताना शेअरमार्केट ट्रेडिंगची लिंक दिसली. त्या लिंकवर त्याने क्लिक केले असता व्हॉटस् अॅप ग्रुपवर जॉईंट होण्यास सांगितले. त्यानंतर ज्यादा परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडत रक्कम भरण्यास टप्प्याटप्प्याने सांगून तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com