सकारात्मक गोष्टी जनतेपर्यंत पोहचवल्याने राणे विजयी

सकारात्मक गोष्टी जनतेपर्यंत पोहचवल्याने राणे विजयी

सकारात्मक गोष्टी जनतेपर्यंत पोहचवल्याने राणे विजयी

राऊतांची निष्क्रियता मांडली ; मराठा आरक्षणाला विरोध मुद्दा गौण

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः मराठा आरक्षणाला नारायण राणेंनी विरोध केल्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसेल, असे विशिष्ठ वर्गाला वाटले होते; परंतु मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव नीलेश राणे यांना पत्करावा लागलेल्या पराभवाची मंगळवारी राणे यांनी विजय मिळवत परतफेड केली.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर राज्यातून त्यांच्या मागणीला पाठिंबा मिळाला; मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला. त्यामुळे हा मुद्दा कोकणात कळीचा ठरेल असे वाटत होते; परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजप सरकारने घेतलेली सकारात्मक भूमिका नारायण राणे यांनी लोकांपर्यंत पोहचवली. मागील दहा वर्षात मतदार संघात कोणतीच कामे झाली नाही. हे त्यांनी मतदारांच्या मनावर बिंबवले. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मागील २०१४ व १९ या लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांमध्ये राणे यांचे थोरले चिरंजीव नीलेश यांचा पराभव केला. त्यापैकी गेल्या निवडणुकीत तर राऊत यांचे मताधिक्य पावणेदोन लाखांपेक्षा जास्त होते. या लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी अनपेक्षितपणे नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. नारायण राणे यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता तसेच शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांना उमेदवारी न मिळाल्याने ते व त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा होती. दलित आणि मुस्लिम मतदारही या वेळी राणेंना सहकार्य करणार नाही, अशी चर्चा होती; मात्र मंगळवारी झालेल्या मतमोजणीमध्ये राणे यांनी मावळते खासदार राऊत यांचा सुमारे ४८ हजार मतांनी पराभव केला.
---
-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com