गेल्या ३ टर्ममध्ये विनायक राऊतांच्या मतात घट

गेल्या ३ टर्ममध्ये विनायक राऊतांच्या मतात घट

राऊतांच्या मतात गेल्या तीन निवडणुकीत घट

उद्धव ठाकरे गटावर आत्मपरीक्षणाची वेळ ; बालेकिल्ला ढासळतोय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा निकाल शिवसेनेला आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे. युती म्हणून निवडणूक लढल्यानंतर विनायक राऊत यांना दोन टर्म घवघवीत यश मिळाले होते; परंतु शिवसेनेत उभी फूट पडून सेनेच्या मतांचे झालेले विभाजन आणि युतीतून फारकत घेतल्यानतंर भाजपची हक्काची मते गमवावी लागल्यानेच ही निवडणूक राऊत यांना भारी पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या तीन निवडणुकीत राऊत यांची मते वाढण्याएवजी प्रत्येक निवडणुकीत सातत्याने ती घटल्याचे आकडेवारी सांगते.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये युती म्हणून शिवसेना-भाजपचे उमेदवार विनायक राऊत निवडणुकीला सामोरे गेले. २०१४ला विनायक राऊत यांना ४ लाख ९३ हजार ८८ मते मिळाली होती. तेव्हा काँग्रेसचे उमेदवार नीलेश राणे त्यांच्या विरोधात होते. त्यांना ३ लाख ४३ हजार ३७ मते घेतली म्हणजे सुमारे दीड लाखाच्या फरकाने ते निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीतदेखील युती म्हणून शिवसेनेचे विनायक राऊत यांना ४ लाख ५८ हजार २२ मते मिळाली होती तेव्हा नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला होता. या वेळी झालेल्या निवडणुकीत नीलेश राणे यांना २ लाख ७९ हजार ७०० मते मिळाली तर काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना ६३ हजार २९९ मते मिळाली होती.
लोकसभा २०२४च्या निवडणुकीपूर्वी मात्र राज्यात अनेक राजकीय उलथापलथ झाली. शिवसेनेत उभी फूट पडली आणि ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली. पक्षाचे नाव गेले, चिन्ह गेले तरी ठाकरे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मदतीने पुन्हा उभे राहिले आणि चांगले यशही मिळविले; परंतु शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात मात्र शिवसेनेची हार झाली. लोकसभा २०२४ला भाजपचे-शिवसेना महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना ४ लाख ४८ हजार ५१४ मते मिळाली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विनायक राऊत यांना ४ लाख ६५६ मते मिळाली. गेल्या तीन टर्ममधील विनायक राऊत यांचा मतांचा टक्का पाहिला तर तो घसरत आलेला आहे.
---------
रत्नागिरीत राऊतांना ५१ हजाराचे मताधिक्य

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यात राऊत यांना तीन विधानसभा मतदार संघात मिळालेली आघाडी अशी, चिपळूण १९ हजार ६२७ चे मताधिक्य मिळाले. रत्नागिरी मतदार संघात १० हजार ३७ तर राजापूर मतदार संघात २१ हजार ४१७ असे एकूण ५१ हजार १३५चे मताधिक्य घेतले.
-----------
-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com