माजी विद्यार्थ्यांतर्फे गुणवंतांचा सन्मान

माजी विद्यार्थ्यांतर्फे गुणवंतांचा सन्मान

88218

माजी विद्यार्थ्यांतर्फे गुणवंतांचा सन्मान
आरोस प्रशाळेत सोहळाः ‘आम्ही वर्गमित्र’चा स्नेहमेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ः आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलच्या १९९१-९२ मधील दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा प्रशाळेत उत्साहात पार पडला. दरवर्षी ‘आम्ही वर्गमित्र’च्या वतीने स्नेहमेळावा घेण्यात येतो. या मेळाव्यातून अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. याही वर्षी असाच सामाजिक उपक्रम राबविला गेला. या विद्यालयातील दहावी व शिरोडा केंद्रांतून बारावीमध्ये प्रथम आलेल्या तसेच ‘आम्ही वर्गमित्र’ ग्रुपवरील सदस्यांच्या मुलांचा यावेळी शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प तसेच चाफा कलम देऊन सत्कार करण्यात आला.
यात तिरोडाची सुकन्या निशिता भोसले, सानिका मोरजकर, जान्हवी मुळीक, तेजल गावडे, अदिती राजाध्यक्ष, मयुरी आरोसकर, निकिता कापडी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना ‘आम्ही वर्गमित्र’च्या सदस्या मनीषा गोवेकर यांनी केली. यावेळी त्यांनी विद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या ग्रुपमार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात, यापुढेही असेच विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी दहावी, बारावीमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी उपस्थित सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मनीषा गोवेकर यांनी उपस्थित सर्व सदस्यांना स्वखर्चाने भेटवस्तू दिल्या. ‘आम्ही वर्गमित्र’कडून विद्यालयास छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा भेट देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीनानाथ काळोजी, राजेश आजगावकर, रुपेश पालयेकर यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन मनीषा गोवेकर यांनी केले. दीनानाथ काळोजी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com