दुचाकी उभी केली वळलो तर ट्रकने ती चिरडली

दुचाकी उभी केली वळलो तर ट्रकने ती चिरडली

-rat५p३०.jpg, rat५p३१.jpg-
P२४M८८२६९
राजापूर ः अपघातग्रस्त दुचाकींची झालेली दूरवस्था.
------------

राजापूर शहरातील अपघात ......लोगो

ट्रकने क्षणात दुचाकी चिरडली...

सुदैवाने बचावले तरूण ; अनुभवला अपघाताचा भीषण थरार


सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ५ ः रस्त्यावर दुचाकी उभी करून जेमतेम ५ फुटावरील टपरीवर फक्त थांबलो अन् डोळ्याच्या पापणी लवते न लवते तोपर्यंत उभ्या केलेल्या दुचाकी चिरडत अन् उडवत कोळशाचा ट्रक पुढे जाऊन उलटला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचलो, अशा शब्दात अपघाताच्या भीषण थराराचा अनुभव दुचाकीस्वाराने सांगितला. त्यांच्या मनामध्ये एका बाजूला भीती आणि एका बाजूला अपघातामध्ये नशीबाने वाचलो अशा संमिश्र भावना होत्या.
मुंबई-गोवा महामार्गावरील कोंढेतड डोंगरतिठा येथे आज सायंकाळी अपघात झाला. त्या अपघातामध्ये ट्रक उलटून पुढील चारचाकी गाडीला धडकला. त्याआधी टपरीवर थांबलेल्या दुचाकींना धडक दिली. त्या दुचाकी चालविणारे चालक अपघातापूर्वी काही मिनिटे अगोदर गाड्या रस्त्यावर उभ्या करून नजीकच्या टपरीवर वडापाव खाण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी काही क्षणांसाठी थांबले होते. मागून आलेल्या ट्रकने पुढे उभी असलेली दुचाकी आणि चारचाकीला धडक देवून ट्रक उलटला. त्याचवेळी मागे पाहतो तर, माझ्या गाडीलाही त्या ट्रकने धडक दिल्याचे दिसले. अन् आपण सुदैवाने वाचलो याची जाणीव झाली. आणखी एका दुचाकीस्वाराने सांगितले की रस्त्यावर दुचाकी उभी करीत असताना अपघातग्रस्त ट्रक एका बाजूला झुकत पुढे येत असल्याचे पाहिले आणि लगेच दुचाकी उभी करून रस्त्याच्या पलिकडे उडी मारली. पाहतो तर ट्रकने आपली दुचाकी घेऊन पुढे चारचाकीला धडक दिली अन् उलटला. अनेकवेळा कोणाचा फोन आल्यास मोबाईल कानाला लावून आणि दुचाकीवर तसाच बसून राहून फोनवर बोलण्याची आपणाला सवय आहे. मात्र, त्यावेळी कोणाचा फोन आला नव्हता. अन्यथा, मी फोन कानाला लावून दुचाकीवर बसून बोलत राहीलो असतो. आज माझे नशीब बलवत्तर होते. अपघाताची माहिती मिळताच मित्र धावतपळत शोधत त्या ठिकाणी दाखल झाल्याचे त्याने सांगितले. .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com