स्वयंहिंसा व कुमारवयीन मुले

स्वयंहिंसा व कुमारवयीन मुले

(३१ मे टुडे ४)


(बालक-पालक ः बहरू आनंदे.............लोगो)

- rat६p१९.jpg -
२४M८८३२९
श्रुतिका कोतकुंडे

इंट्रो

सोळा वर्षाच्या आदितीला दवाखान्यात आणले होते. दहावीचा निकाल लागला होता आणि आदितीला तिच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी मार्क मिळाले होते. या दुःखात तिने फिनेल पिऊन जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता.

- श्रुतिका कोतकुंडे
सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण,
sajagclinic@gmail.com

----

स्वयंहिंसा व कुमारवयीन मुले

भारतासारख्या प्रगतिशील देशात कुमारवयीन मुलांमध्ये व तरुणांमध्ये स्वहिंसा व त्यामुळे अपघातातून मृत्यू वाढत चालले आहेत. बदलत्या जीवनशैलीत वाढत्या ताणाचा सामना करू न शकलेली मुलं मिळेल ते साधन वापरून स्वहिंसा करीत आहेत. शहरी भागात औषधाच्या गोळ्यांची अतिसेवन तर ग्रामीण भागात सहज उपलब्ध कीटकनाशक व घरगुती विषारी रासायनिक पदार्थ प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न मुलं करतात. गळफास लावणे दोन्ही ठिकाणी आढळते. मुले आणि मुली दोघेही स्वहिंसेचे बळी ठरतात. गोळ्या खाणे हा स्वहिंसेचा कमी घातक प्रकार आहे तसेच स्वतःला तीक्ष्ण हत्याराने कापून घेणे, स्वतःला विद्रुप करणे हेही मुलं करतात. मुलांपेक्षा मुली कमी घातक प्रकार करताना आढळतात तर मुले गळफास, बंदूक इत्यादी घातक प्रकार करतात.

घातक व कमी घातक प्रयत्न हे समीकरण बदलत जाते. त्याची कारणे म्हणजे

* दीर्घ नैराश्य
* चंचलतेच्या, रागाच्या भरात वैतागल्यामुळे
* हिंसक वागण्याचा इतिहास असल्यास
* इतरजण आपली उपेक्षा करीत आहेत असे वाटल्यास
* अतिताण आल्यामुळे

मुलाने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्न गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा ही एक अगतिक हाक असते, मनाच्या तगमगीचे लक्षण असते, प्रश्न सोडवण्यात हतबलता असते. मूल आत्महत्येचा विचार बोलून दाखवत असेल तर आत्महत्येची जोखीम वाढते.

* मुलाने जीव कसा संपवायचा त्याचा विचार केला असेल
* प्रत्यक्षात पावले उचलायला सुरवात केली असेल जसे बंदूक, विष किंवा गोळ्या जमवाजमव
* त्याचे विचार कमालीचे नैराश्याचे व अवास्तविक असतील तर
* हिंसक, रागीट वागणे वाढत असेल
* आत्महत्येचा प्रयत्न करून झाला असेल

ज्या मुलांनी स्वतःला इजा केली आहे ते पुन्हा इजा करू शकतात हे जाणावे जर
- ज्या स्तिथीमुळे स्वतःला इजा केली ती स्थिती जास्त काळ चालू असेल
- मूल स्वतःला इजा करीत असताना घरी एकटं होतं
- स्वतःला इजा घाईत नव्हे तर खूप विचारअंती नियोजनबद्ध पद्धतीने केली होती.
- मुलाला भविष्याबद्दल सतत निराशा वाटत असेल
- मुलाला सतत उदास वाटत असेल
- मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न लपवण्याचा प्रयत्न केला असेल
- आत्महत्या करण्याआधी त्या संदर्भात चिठ्ठी लिहिली असेल
- मुलाने आत्महत्या अयशस्वी झाल्यावर मदत मिळवण्यासाठी काहीही प्रयत्न केलेला नसेल
- हिंसक व जोखामीचा प्रयत्न असेल
या सर्व कारणांमुळे मुलांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नांची योग्य चिकित्सा अतिशय महत्वाची असते कारण, अगतिकतेमध्ये मूल पुन्हा तसे वागू शकते. अशा सर्व मुलांमध्ये ज्यांच्यात आत्महत्याचे विचार किंवा वागणे दिसते त्यांच्यावर देखरेख ठेवणे महत्वाचे. परिवाराने व मित्रमंडळींनी जोखीम गंभीर असेल तर मुलाला एकटे सोडू नये.

आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलाचे समुपदेशन कसे कराल? जिथे समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध नसेल तिथे मुलांशी त्यांच्या जवळच्यांनी संवाद साधावा. सोप्या शब्दात सर्वसाधारण विषयाकडून सुरवात करून महत्वाच्या विषयांवर सावकाश यावे. जसे मित्रांसोबत काय करायला आवडते, अजूनही आवडते का? सर्वात जास्त वाईट कशामुळे? उदास आहेस का? लोकांना तू आवडत नाहीस, असे वाटते का? कशावरून असे वाटते? भविष्याबद्दल काय वाटते? भविष्याबद्दल अगतिक किंवा निराशावादी वाटते का? यानंतर आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत विचारावे. विचार व कृतीविषयी विचारावे. सहजपासून सुरवात करून गंभीर प्रश्नांपर्यंत यावे. जगण्यापेक्षा आपण मेलो तर चांगले असे वाटते का? आपण स्वतःचा जीव घेण्याबाबत विचार केला होता का? कधी केला होता? काय केलं होतं? मग काय झाले होते? आता त्याबद्दल काय वाटते असे प्रश्न तयार असल्यास अतिशय संवेदनशीलतेने व योग्य त्या खासगी व आधाराच्या वातावरणात विचारावे व मुलाची जोखमीची पातळी समजून घ्यावी. तशी माहिती परिवाराला द्यावी जेणेकरून मुलाची देखरेख शक्य होईल व आत्महत्या भविष्यात टाळता येईल. मुलाबद्दल अधिक माहिती परिवाराकडून, मित्रांकडून, शिक्षकांकडून गोळा करावी व ताण कमी करण्याचे मार्ग सुचवावे. जवळच्यांशी संपर्क करून संवाद वाढवण्यासाठी मदत करावी. गरज भासल्यास ताणातून रस्ता काढण्यास मदत करावी. समुपदेशाकाचा संदर्भ उपलब्ध करून द्यावे त्यामुळे त्याला मुलाच्या मनाची तगमग कमी होईल, तो मोकळा बोलू शकेल. परिवाराला धारवाल्या वस्तू, विषारी कीटकनाशक, घरगुती विषारी रसायने सुरक्षित ठेवायला सांगाव्या जेणेकरून मूल स्वतःला इजा करण्याची शक्यता कमी होईल. पौगंडावस्थेतील मुलांना समस्या निवारण करण्यासाठी घरात मोकळा संवाद आणि योग्य ती आधारव्यवस्था असली तर ही स्वहिंसेची त्सुनामी आपण नक्की रोखू शकू. आदितीच्या आई-वडिलांशी आणि आदितीशी संवाद साधून तिच्या मनावरचा भार हलका झाला. ती आता पुढील अभ्यासक्रमासाठी सकारात्मक झाली आहे.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com