आरोग्य विभागाकडून २१ पर्यंत अतिसार पंधरवडा

आरोग्य विभागाकडून २१ पर्यंत अतिसार पंधरवडा

आरोग्य विभागाकडून ‘अतिसार’ पंधरवडा

राष्ट्रीय आरोग्य अभियान ; जिल्ह्यात २१ जून पर्यंत मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः आरोग्य विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवड्यानिमित्त आजपासून जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. विविध उपक्रम २१ जूनपर्यंत जिल्ह्यात राबवण्यात येणार आहेत.
अर्भक मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवून रत्नागिरी जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवण्यात येणार आहे. अतिसारामध्ये ओआरएसचे द्रावण व झिंक गोळी सर्वात प्रभावी उपचारपद्धतीने असून, अतिसाराला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक त्या विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. अतिसार झालेल्या बालकात सौम्य किंवा गंभीर जलशुष्कता, अस्वस्थपणा, चिडचिडेपणे, डोळे खोल जाणे, घटाघटा पाणी पिणे, त्वचेचा चिमटा घेतला असल्यास हळुहळू पूर्ववत होणे, सुस्तावलेला किंवा बेशुद्धावस्थेत पडणे, स्तनपान करणे अशी लक्षणे आढळून येतात. मातांनी स्वयंपाक करण्यापूर्वी, बालकाला जेवण भरण्यापूर्वी तसेच बालकाची स्वच्छता केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्यावे. पिण्याचे पाणी स्वच्छ असल्याची तसेच ते सुरक्षित व झाकण असलेल्या भांड्यात साठवले असल्याची खात्री करावी. बालकाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. नेहमी शौचालयाच्या वापर करावा. उघड्यावर शौच करू नये. बालकाला अतिसार झाल्याबरोबर तसेच प्रत्येकवेळी शौच झाल्यावर बालकाला लगेच ओआरएसचे द्रावण द्यावे. एका चमच्यात पिण्याचे पाणी किंवा मातेचे दूध घ्यावे व त्यात एक झिंकची गोळी विरघळून बालकाला दिवसातून एकदा अशाप्रकारे १४ दिवस द्यावी. अतिसारादरम्यान व नंतर बालकाला पूरक आहार आणि स्तनपान देणे चालू ठेवावे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com