मोदीजींचे विचार कोकणवासियांनी स्वीकारले

मोदीजींचे विचार कोकणवासियांनी स्वीकारले

rat६p८.jpg -
२४M८८३३२
खेड - नारायण राणे यांच्या विजयानंतर जल्लोष करताना खेडमधील भाजप व सेना कार्यकर्ते.

मोदींना दिली कोकणवासियांनी पंसती

अनिकेत कानडे ः भाजपतर्फे खेड शहरात मिठाई वाटप

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ६ : कोकणवासी यांचे मी आभार मानतो कारण, देशातला निकाल कमी-जास्त असला तरीही कोकणवासीय मोदींच्या पाठी ठाम उभा आहे, असे शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी सांगितले.
खेडमध्ये भाजपकडून संपूर्ण निवडणुकीचा निकाल पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यालयात सर्व भाजपप्रेमी नागरिक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कोकणातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले कोकणचे नेते नारायण राणे आणि सुनील तटकरे विजयी झाल्यानंतर खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे विजय घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच रायगड मतदार संघातून सुनील तटकरे यांनाही विजयी घोषित झाल्याबरोबर संपूर्ण भाजप कार्यकर्ते यांनी खेड शहरात मिठाई वाटत फटाक्यांची चौकाचौकात आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष आबा जोशी, संजय बुटाला, संजय विचारे, वैजेश सागवेकर, संतोष भागवत, नितांत तलाठी, मंदार आपटे, रोहन राठोड, उल्हास बाळ, सुहास सोहनी, ॲड. जाडकर, अविनाश माने, ओमकार पाटणे, मुन्ना बेन्दरकर, राजु केळकर यांसह अनेक कार्यकर्ते, नागरिक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी राणेसाहेब तुम आगे बढो अशा घोषणा देत तीनबत्ती नाका, एसटी बसस्थानक, छत्रपती शिवाजीचौक, भरणेनाका आदी ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com