आसोलीच्या सुरंगीला वाशीची बाजारपेठ

आसोलीच्या सुरंगीला वाशीची बाजारपेठ

88350

आसोलीच्या सुरंगीला वाशीची बाजारपेठ
‘झेप’चा पुढाकारः अर्चना घारेंकडून विशेष प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ६ : तालुक्यातील आसोली गावातातील महिलांच्या ‘झेप’ प्रभाग संघाच्या सुरंगीच्या फुले आणि कळ्यांना वाशीची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. याची पहिली गाडी रवाना झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते काल (ता. ५) श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
सुरंगीची फुले व कळ्या या एकत्र करून सुमारे चार टन माल असणारी पहिली गाडी वाशी बाजारपेठेला रवाना झाली. येथील महिला भगिनींना रोजगार मिळावा, शेतमालाला योग्य भाव मिळावा, या हेतूने अर्चना घारे यांनी परिश्रम घेतले. याबद्दल महिलांच्या संघाकडून त्यांचे धन्यवाद मानले.
सौ. अर्चना घारे म्हणाल्या, ‘‘प्रभाग संघाच्या सचिव रिया धुरी यांनी माझ्याकडे पाठपुरावा केल्यामुळे शेतमालाला वाशीसारखी बाजारपेठ उपलब्ध करून देता आली. वाशीमध्ये हा माल थेट जाणार आहे. आज एक गाडी जात असली तरी भविष्यात शेकडो गाड्या येथून वाशीला जातील. माझ्या महिला भगिनी सधन व्हाव्यात, हा उद्देश आहे. महिला भगिनींसाठी योगदान देता आले, याचे समाधान आहे. शेतमालाला दलालाविना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल, याचा आनंद आहे.’’
यावेळी महिला संघाच्या सचिव रिया धुरी, राष्ट्रवादीचे आसोली गाव अध्यक्ष विक्रांत कांबळी, विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक, युवा अध्यक्ष विवेक गवस, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब आदींसह आसोली ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com